‘अजित श्री’चा मानकरी ठाण्याचा रोहित शेट्टी
By Admin | Updated: July 28, 2015 00:47 IST2015-07-28T00:47:49+5:302015-07-28T00:47:49+5:30
राज्यस्तरीय निमंत्रित शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या रोहित शेट्टी याने ‘अजित श्री’चा किताब पटकाविला. स्पर्धेवर ठाणे संघांच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले.

‘अजित श्री’चा मानकरी ठाण्याचा रोहित शेट्टी
पिंपरी : राज्यस्तरीय निमंत्रित शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या रोहित शेट्टी याने ‘अजित श्री’चा किताब पटकाविला. स्पर्धेवर ठाणे संघांच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नुकतीच झाली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण जय मल्हार फेम देवदत्त नागे यांच्या हस्ते झाले. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक हनुमंत गावडे, जगदीश शेट्टी, अरुण टाक, जितेंद्र ननावरे, नीलेश पांढरकर, अरुण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
निकाल पुढीलप्रमाणे : ५५ किलो : सोमनाथ पाल (पुणे), काशिनाथ मेस्त्री (पिंपरी-चिंचवड), नीलेश लंगडेवाले (सोलापूर). ६० किलो : रोशन तटकरे (पश्चिम ठाणे), फरहान सय्यद (ठाणे), रोहित पवार (पुणे). ६५ किलो : गणेश मोरे (मुंबई), संतोष थोरात, तुषार चोरगे (दोघे पुणे). ७० किलो : अभिजित थोपटे (पुणे), राहुल भंडारे (पुणे), सिवाश्री त्रिपाठी (पश्चिम ठाणे). ७५ किलो : नरेश नागदेव (ठाणे), महेश जाधव (पुणे), रवींद्र फजुवंजारी (जळगाव). ८० किलो : बळीराम म्हात्रे (ठाणे), अवधेश यादव (पश्चिम ठाणे), प्रज्वल शेट्टी (ठाणे). ८५ किलो : रोहित शेट्टी, सागर आलदे (दोघे ठाणे), अमित सरवणकर (पुणे). ८५ किलोवरील : अमित नाईक (ठाणे), सुमित दांगट (पुणे), हरमीत सिंग (ठाणे). (प्रतिनिधी)