शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad : तळवडेतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, सहा महिला ठार; मालकासह दहा महिला कामगार जखमी

By नारायण बडगुजर | Updated: December 8, 2023 16:20 IST

पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचा माहिती आहे...

पिंपरी - वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या फटाक्यांच्या (फायर क्रॅकर) कारखान्यात स्फोट झाल्याने सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात कारखाना मालकासह १० महिला जखमी झाल्या असून, काहीजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे येथील जोतिबानगरात शुक्रवारी (दि. ८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्फोटामागील आगीचे कारण समजू शकले नाही.

मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, तर अपेक्षा तोरणे (वय २६), प्रियंका यादव (३२), कविता राठोड (४५), राधा ऊर्फ सुमन राठोड (४०), उषा पाडवी (४०), रेणुका ताथवडे (२०), कोमल चौरे (२५), शिल्पा राठोड (३१), प्रतीक्षा तोरणे (१६) आणि कारखाना मालक शरद सुतार (४५, सर्व रा. तळवडे) अशी जखमींची नावे आहेत.

तळवडेतील ‘राणा इंजिनिअरिंग’ या फॅब्रिकेशन शाॅपच्या परिसरात मोठ्या शेडमध्ये फायर क्रॅकर बनवण्याचा अनधिकृत कारखाना आहे. येथे पंधरा ते वीस महिला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत फटाका बनविण्याचे काम करीत होत्या. दुपारी तेथे अचानक आग लागून स्फोट झाला. फायर क्रॅकरचे साहित्य आणि दारूने पेट घेतला. कारखान्यास एकच दरवाजा असल्याने महिलांना बाहेर पडता आले नाही. स्फोटात सहा महिलांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर इतर दहा महिला आणि कारखानामालक जखमी झाला.

स्फोटाचा आवाज होताच आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी कळवल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना तसेच मृतांना बाहेर काढले. सर्वांना तत्काळ महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये काही गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मृतांची ओळख पटविण्यात अडचणी -फटाक्याच्या दारूमुळे मृतांचे चेहरे, कपडे पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. शरीराचा कोळसा झाल्यामुळे नातेवाईकांनाही ओळख पटत नव्हती.

‘रेडझोन’मध्ये अनधिकृत उद्योग -संरक्षण विभागाच्या दारूगोळा कारखान्यामुळे तळवडे परिसर ‘रेडझोन’मध्ये आहे. त्यामुळे येथे बांधकाम किंवा कोणत्याही प्रकल्पास परवानगी देण्यात येत नाही. असे असतानाही अनेक अनधिकृत शेड आणि बांधकामांची उभारणी झाली आहे. हा शोभेच्या फटाक्यांचा कारखाना बिनदिक्कत सुरू होता. याबाबत प्रशासनाला माहिती नसल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत -या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक