माहेरहून तीन लाख आण, अन्यथा जिवाचे बरे-वाईट करेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:28 IST2019-02-19T01:28:03+5:302019-02-19T01:28:07+5:30

विवाहितेला धमकी : मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Take three lakhs from the mare, otherwise you will have to do good and bad karen | माहेरहून तीन लाख आण, अन्यथा जिवाचे बरे-वाईट करेन

माहेरहून तीन लाख आण, अन्यथा जिवाचे बरे-वाईट करेन

पिंपरी : आई-वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन ये, अन्यथा स्वत:च्या जिवाचे बरे वाईट करून तुम्हाला कामाला लावेन, असे धमकावत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय महिलेने निगडी पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे. देविदास मारुती मासाळकर (संभाजीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. के्रडिट कार्डद्वारे घेतलेले कर्ज मौज मजेसाठी वापरले. आई वडिलांकडून तीन लाख रुपये आणावेत, असा तगादा लावला. विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ केला. स्वयंपाक केला नसल्याचे किरकोळ कारण पुढे करून महिलेचे डोके भिंतीवर आपटले. तिला जखमी केले. विवाहितेने आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
 

Web Title: Take three lakhs from the mare, otherwise you will have to do good and bad karen