शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’; तडीपार आरोपीकडून पोलिसांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 10:48 IST

पवनेश्वर मंदिराच्या मागील पुलावर, पिंपरीगाव येथे रविवारी (दि. ३) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली

पिंपरी: तडीपार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कोयता दाखवत आरोपीने धमकी दिली. आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट, अशी धमकी त्याने दिली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. पवनेश्वर मंदिराच्या मागील पुलावर, पिंपरीगाव येथे रविवारी (दि. ३) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी अतुल याच्याकडे कोयता मिळून आला. त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत त्याने झटापटी केली. आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट, असे म्हणून कोयता हातात घेऊन अतुल पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज दिवस तुमचा आहे. उद्या काय करणार. तुम्हाला मीच पुरा पडणार, असे त्यावेळी अतुल म्हणाला. तसेच शिवीगाळ करून त्याने पोलिसांना धमकी दिली. 

पोलिसांना जीवे मारण्याची धमकी; तडीपार आरोपीला बेड्याहर्षल उर्फ गबऱ्या रामदास पवार (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची कॉलर पकडून त्याने झटापटी केली. तसेच पोलीस कर्मचारी विकास रेड्डी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी रेड्डी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पवार याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpri-acपिंपरीPuneपुणे