शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू बळावला

By admin | Updated: August 14, 2015 03:12 IST

पावसाळी वातावरणामुळे साथीचे आजार बळाण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लूचा विळखा शहरास बसू लागला आहे.

पिंपरी : पावसाळी वातावरणामुळे साथीचे आजार बळाण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लूचा विळखा शहरास बसू लागला आहे. साथीचे आजार वाढत असताना महापालिका यंत्रणा अजूनही ढिम्म असल्याचे दिसून येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर स्वाइन फ्लूचा पहिला बळी जुन्नरची महिला ठरली आहे. पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढायला सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी याच वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी महिन्यापासूनच स्वाइन फ्लूचे रुग्ण अधिक आढळून आले. गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने ३३ जणांचा बळी घेतला आहे. दिनांक १ जानेवारी २०१५पासून आजपर्यंत ६ लाख ७१ हजार ८५६ रुग्णांची प्राथमिक तपासणी झाली आहे. यापैकी ८१ हजार ७१६ जणांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असल्याचे आढळले. यातील एकूण २० हजार ७०१ जणांना टॅमी फ्लू देण्यात आल्या. यामधून ६९० रुग्णांचे लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. स्वाइन फ्लूची लागण झालेले ३७२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या वतीने स्वाइन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज आहे. मात्र, प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतेय२००९मध्ये स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्या वर्षात स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूची संख्या २१ इतकी होती. या तापामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या सन २०१०मध्ये होती. ५६ जणांचा बळी घेतला होता. पोहोचला होता. तर, २०११मध्ये फक्त एकच मृत्यू झाला होता.नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, डोके दुखत असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. औषधाच्या दुकानात जाऊन परस्पर औषधे घेऊ नयेत. अधिक माहितीसाठी किंवा उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात संपर्क साधावा, गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घेणे, मधुमेह, रक्तदाब असे इतर आजार असणाऱ्यांनीही काळजी घेणे, आवश्यकता असल्यास टॅमी फ्लूच्या गोळ्या घ्याव्यात, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)