शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीला साथीच्या आजारांचा विळखा, स्वाइन फ्लूने दगावले ५८ जण, डेंगीने काढले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:55 IST

पिंपरी : हवामानातील बदलामुळे आणि महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया या साथीच्या आजारांचा विळखा पडला आहे.

पिंपरी : हवामानातील बदलामुळे आणि महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया या साथीच्या आजारांचा विळखा पडला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षाने साथीचे आजार वाढल्याची टीका होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. महापालिकेतील आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शहराचे आरोग्य बिघडले आहे. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत १० महिन्यांच्या कालावधीत थंडी, ताप, डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली आहे. डेंगीचे तब्बल ३१६, तर चिकुनगुनियाचे ५४ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे आहे. खासगी व शासकीय अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांत डेंगीचे रुग्ण उपचारास असल्याने पालिकेकडे या संदर्भातील ठोस आकडेवारी उपलब्ध नाही.आरोग्य विभाग झोपलेलामहापालिकेतील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औषधांची फवारणी करून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वैद्यकीय विभागातील आरोग्यसेवकांमार्फत जनजागृती व समुपदेशन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रबोधन दिसत नाही. कीटकनाशक विभागामार्फत रुग्ण परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना, कंटेनर सर्वेक्षण आणि धूरफवारणी केली जात आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात प्रभागांतील चित्र वेगळेच आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळेत आणि त्या शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेºयांचे आयोजन करून कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत डेंगीचे दोन हजार ६०० संशयित, तर ३१६ सदोष रुग्ण आढळले आहेत. हिवतापाची आकडेवारी पाहिली असता, ७२ हजार ३०२ संशयित रुग्ण, तर ३७ सदोष रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचे ५४ संशयित रुग्ण आढळले आहेत.तातडीची बैठकशहराच्या बिघडलेल्या आरोग्याबाबत तक्रारी वाढल्याने आरोग्य विभागाची बैठक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी घेतली आहे. त्यात प्रभागनिहाय कचºयाचे नियोजन करून उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना पवार यांनी केल्या आहेत.या विषयी पवार म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या सत्ताधाºयांनी केलेल्या चुका सुधारण्यात वेळ जात आहे. कचरा वाहतूक करणारी वाहने खरेदी न केल्याने कचरा उचलण्यात अडथळे येत आहेत. कचºयासंदर्भात आढावा घेतला आहे. या विषयी आता निविदा प्रक्रिया केली आहे. लवकरच आरोग्याची समस्या कमी होईल. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.’’>स्वाइन फ्लूचे बळीस्वाइन फ्लूने गेल्या दहा महिन्यांत ५८ बळी गेले आहेत. गेल्या काही वर्षांतील ही बळींची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या दहा महिन्यांत नऊ लाख ६१ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यांपैकी ८८१६ जणांना टॅमी फ्लू गोळ्या देण्यात आल्या. ८४९ जणांचे थुंकी आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यांपैकी ४०६ पॉझिटिव्ह आढळले, तर आजवर ५८ जणांचा बळी गेला आहे.जनजागृतीचा फार्ससाथीचे आजार रोखण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. नगरसदस्यांच्या सहकार्याने आणि सार्वजनिक मंडळांच्या मदतीने जनजागृती होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.>अशी घ्यावी काळजीपाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, परिसरात साचलेले पाणी काढावे.न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळावे.>हवामान बदलाचा आरोग्यावर परिणामताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणेस्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखीटायफॉइड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणेकॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखीगॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकर येणे, भूक मंदावणेकावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखी