शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा; पिंपरी चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी उपोषण

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 8, 2023 16:10 IST

आंदोलनादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली

पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी- चिंचवड शहर) वतीने जालना येथील अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून पिंपरी येथे साखळी उपोषणाला गुरुवारपासून (दि. ७) सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी, निगडी येथील भक्ती- शक्ती समूह शिल्पातील छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सतीश काळे व अनेक समन्वयक गुरुवारी (दि. ७) सकाळी ११ वाजल्यापासून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपोषणाला बसले आहेत. शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव, लहू लांडगे, जीवन बोराडे, नकुल भोईर, ॲड. लक्ष्मण रानवडे, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, धनाजी येळकर-पाटील, वैभव जाधव, सुनिता शिंदे, गोपाळ मोरे, रविशंकर उबाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

दरम्यान, या आंदोलनादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन धंगेकर यांनी दिले. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम तसेच, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रशांत शितोळे यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून मागण्यांना पाठिंबा दिला.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलनMLAआमदारMorchaमोर्चा