सुहास गरुड यांनी स्वीकारला पदभार

By Admin | Updated: May 10, 2017 03:40 IST2017-05-10T03:40:58+5:302017-05-10T03:40:58+5:30

सुहास गरुड यांनी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची सूत्रे सोमवारी (दि. ८) स्वीकारली. गरुड आपल्या कार्यालयात

Suhas Garud accepted the charge | सुहास गरुड यांनी स्वीकारला पदभार

सुहास गरुड यांनी स्वीकारला पदभार

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : सुहास गरुड यांनी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची सूत्रे सोमवारी (दि. ८) स्वीकारली. गरुड आपल्या कार्यालयात येणार आहेत हे समजताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायती समोरचे आवारात सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना भेटून अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आपल्या पोलीसनिरीक्षकपदाच्या कारकिर्दीत लँड, सॅडमाफियांसमवेत लहान-मोठे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांवर वचक ठेवून त्यांचा सिंघम स्टाईलने बीमोड करणारे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे सुहास गरुड यांची नियुक्ती हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाल्याचे समजताच गुडांना घाम फुटला असून, सर्वसामान्यांना आनंद झाला आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये सुहास गरुड यांची नियुक्ती हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाल्याचे समजताच सर्वसामान्यांना आनंद झाला असून, गुंडांची पाचावर धारण बसली आहे.
गरुड यांनी देहूरोड व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम केले असल्याने त्यांना तालुक्याची माहिती असल्याने व पदोन्नतीमुळे त्याचे कार्यक्षेत्र वाढल्याने ते पूर्वीपेक्षा जोमदार कामगिरी करणार, असा विश्वास सर्वसामान्यांना असल्याने सिंघम इज बॅक अशी चर्चा होत असून, गुन्हेगारी क्षेत्र मात्र हादरून गेले आहे.

Web Title: Suhas Garud accepted the charge