शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘इलेक्ट्रिक बस’ची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 01:41 IST

अनेक महिन्यांपासून चर्चेत : पर्यावरणपूरक व सक्षम व्यवस्थेसाठी गरजेची

पुणे : पर्यावरणपूरक व सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘इलेक्ट्रिक बस’ची अखेर गुरुवारी शहरात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. पुढील सात दिवस भरलेली पोती टाकून शहराच्या सर्व भागातून, मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच शहरात २५ इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

पुणे शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व पीएमपीच्या ताफ्यात सक्षम व चांगल्या बस आणण्यासाठी इलेक्ट्रिक बसेचा पर्याय समोर आला. अनेक महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठीची पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली. नऊ मीटर लांबीची ही ‘नॉन बीआरटी बस’ बीवायडी (ओलेक्ट्रो) कंपनीची आहे.

पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेचे पाऊल म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० वातानुकूलित ई-बस घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० आणि दुसऱ्या टप्प्यात ३५० बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५० बस त्यांपैकी २५ मिडी आणि १२५ रेग्युलर बस घेणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली. त्यामध्ये नऊ मीटर लांबीच्या बससाठी बीवायडी (इलेक्ट्रो) कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे, तर १२ मीटर लांबीच्या बससाठी टाटा कंपनी व ‘बीवायडी’ कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे.

महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव, पीएमपीच्या व्यवस्थापकीय अध्यक्ष नयना गुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ८) टिळक रोड, स्वारगेट, बाजीराव रोड या परिसरात चाचणी घेण्यात आली.शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोगी ठरेलशहरात दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसची चाचणी गुरुवारी घेण्यात आली. बाजीराव रोड, टिळक रोड या गर्दीच्या रस्त्यांवर या बसची चाचणी घेण्यात आली. आवाजविरहित, अत्यंत स्मूथ अशी ही इलेक्ट्रिक बस आहे. सध्या देशात व जागात सर्वच ठिकाणी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक बसची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या इलेक्ट्रिक बस उपयोगी ठरतील.- मुक्ता टिळक, महापौर२६ जानेवारीपर्यंत शहरात २५ इलेक्ट्रिक बसपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० वातानुकूलित ई-बस घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठीच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपनीकडून गुरुवारी (दि. ८) सार्वजनिक वाहतुकीतील शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली. आता पुढील सात दिवस शहराच्या विविध भागात या बसची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर कर्मशील बीड ओपन करून सुरुवातील २५ इलेक्ट्रिक बसची आॅर्डर देण्यात येईल. यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत शहरात २५ इलेक्ट्रिक बस सुरू होतील.- सिद्धार्थ शिरोळे, संचालक पीएमपी 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड