शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्टायलिश बाईकला मागणी, तरुणाईमध्ये दुचाकीची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 23:49 IST

तरुणाईमध्ये क्रेझ : अनेक कंपन्यांनी केले वाहनांमध्ये बदल

रहाटणी : ‘स्टायलिश बाईक’ खरेदी करण्याकडे तरुणांचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांच्या ‘स्टायलिश’ बाईकची बुकिंग आणि विक्री झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. आज तरुणांबरोबरच इतर ग्राहकांचाही मायलेजबरोबरच स्टायलिश बाईक खरेदीकडे ओढा दिसून येतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सर्वांच्याच पसंतीला पडतील अशा स्टायलिश बाईक बाजारात आणत आहेत.

तर कही वाहन उत्पादन कंपन्या आहे त्याच वाहनात बदल करून त्यात वेगळेपणा असल्याचे सांगत किमतीचा ताळमेळ बसवत वाहने बाजारात आणत आहेत. त्यामुळे सध्या वेगवेगळे स्टायलिश बाईक बाजारात दिसून येत आहेत. हिंदू धर्मामध्ये दिवाळी व पाडवा सणाला काही महत्त्वाचे खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. त्यामुळे बहुतांश जण दिवाळीत व पाडव्याला नवीन वाहन खरेदी करतात. परंतु स्टायलिश वाहन खरेदीसाठी प्रथम नंबर लावावा लागत असल्याने काही नागरिक तर मुहूर्तदेखील पाहत नाहीत. मुलांचे लाड पुरविण्यासाठी मनासारखे वहान मिळताच खरेदी केली जात आहे़ काही जण फक्त मुहूर्त पाहूनच वाहन खरेदी-विक्री करतात. त्यामुळे असे वाहन उत्पादन करणाºया विविध कंपन्यांनी आपली नवनवीन आकर्षक वाहने बाजारात आणली आहेत. या वाहन बाजारात वाहन खरेदीची चांगलीच ‘धूम’ दिसून येत आहे.सध्या दुचाकीमध्ये विशेषत: तरुणवर्ग स्टायलिश बाईककडे आकर्षित होत असल्याचे काही वाहन विक्रेत्यांनी सांगितले. पेट्रोलचे दर आकाशाला भिडलेले असल्याने दुचाकी मायलेज देणारी असावी, शिवाय ती स्टायलिशही असावी, असे ग्राहकांना वाटत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त वाहन बाजारात मोठी उलाढाल झाली व शेकडो स्टायलिश बाईक रस्त्यावर आल्या व येतील.स्टायलिश बाईक बरोबरच मनपसंद वाहनांचा नंबर घेण्याकडेदेखील अनेक तरुणांचा कल दिसून येत आहे. शाळा कॉलेजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी तसेच आपली इतर तारुणांवर वेगळी छाप पडावी म्हणून काही तरुण मनपसंद वाहन क्रमांकासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत़वाहन कार्यालयात नंबर लावण्यासाठी गर्दी होणार आहे तर कही तरुण वशिलेबाजी करत आहेत़ काही आमदार, खासदार मोठे अधिकारी यांच्या ओळखीचा फायदा घेत वशिला लावत आहेत.धूम स्टाईल बाईकमुळे अपघातात वाढशाळा, कॉलेज व इतर तरुणांमध्ये धूम स्टाईल बाईक चालविण्याची जणू काय स्पर्धाच सुरू झाली की काय असे दिसून येत आहे. अनेक तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून व दुसºयालाही इजा पोहोचेल अशी बाईक चालवीत आहेत़ त्यामुळे अशा रफदार बाईकच्या वेगामुळे दररोज छोटेमोठे अपघात होऊन काही तरुण आपल्या प्राणाला मुकत आहेत तर दुसºयाच्याही मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत़ यावर कुठेतरी अंकुश ठेवण्याची काळाची गरज आहे.

टॅग्स :bikeबाईकtwo wheelerटू व्हीलरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड