शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या धोकादायक इमारतीच्या आवारात विद्यार्थ्यांचा होतोय वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 14:21 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देअपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता धोकादायक इमारतीचा फलकदुघर्टना घडल्यास जबाबदार कोण?इमारत हटविण्याकडे दुर्लक्ष

शीतल मुंडे-

पिंपरी : भोसरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटमधून समोर आले आहे. त्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने शाळेच्या आवारातच पत्र्याचे शेड उभारून वर्गखोल्या तयार केल्या. तरीही विद्यार्थी येथील धोकादायक इमारतीमध्ये ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, ही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेविद्यार्थ्यांच्या पालक संताप व्यक्त करीत आहेत.........धोकादायक इमारतीचा फलकमहापालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयाने दि. ३ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला भोसरी येतील शाळेची इमारत धोकादायक असल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर दि. २९ सप्टेंबर २०१९ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा भरवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. तीन महिन्यांपासून बाजुच्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरत आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा वावर हा धोकादायक इमारतीच्या आवारात असतो. या  इमारतीमध्ये विद्यार्थी मध्यान्य भोजन घेतात, तसेच खेळतात.............दुघर्टना घडल्यास जबाबदार कोण?महापालिका प्रशासनाने इमारत धोकादायक असल्याचा सूचना फलक लावून हात वर केले आहेत. मात्र, शाळेची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटनुसार सुरक्षित नसून, परिसरात वापर करण्यास मनाईचा सूचना फलक उभारून प्रशासन जबाबदारी झटक आहे.  मात्र, बाजुच्या पर्यायी शाळेतील विद्यार्थी या इमारतीमध्ये ये-जा करत असतात. संभाव्य धोका महापालिका प्रशासनाला, शाळा प्रशासनाला माहीत असतानादेखील कोणीही ही जबाबदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सजग पालक व नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...........इमारत हटविण्याकडे दुर्लक्षमहापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळेची धोकादायक इमारत पाडण्याबाबत स्थापत्य विभागाला पत्र देण्यात आले आहे. मात्र स्थापत्य विभाग शिक्षण विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवत आहे. इमारत हटविण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष करीत टोलावाटोलवी सुरू केल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनातील दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याचेही समोर आले आहे........खबरदारीची आवश्यकताशाळेची इमारत धोकादायक आहे. तरीदेखील त्या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये जाऊ नयेत म्हणून शिक्षकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा काही पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. .....श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक आहे़ त्यामुळे शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.  धोकादायक इमारत हटविण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून स्थापत्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. इमारत हटविण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे. - पराग मुंडे, प्रशासकीय अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, महापालिका  ......

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थी