Pimpri Chinchwad: बांधकाम साईटवर सज्जा कोसळला; महिलेचा मृत्यू, कामगार जखमी

By नारायण बडगुजर | Updated: April 1, 2024 15:22 IST2024-04-01T15:21:58+5:302024-04-01T15:22:21+5:30

वडमुखवाडी चऱ्होली येथे मंगलमूर्ती हाईट्स या बांधकाम साईटवर २९ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला...

Structure collapses at construction site; Woman dies, worker injured pune latest crime | Pimpri Chinchwad: बांधकाम साईटवर सज्जा कोसळला; महिलेचा मृत्यू, कामगार जखमी

Pimpri Chinchwad: बांधकाम साईटवर सज्जा कोसळला; महिलेचा मृत्यू, कामगार जखमी

पिंपरी : बांधकाम प्रकल्पात दोन कामगार सज्जावर चढून प्लास्टर करत असताना सज्जा कोसळला. यात जखमी होऊन एका कामगार महिलेचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला. वडमुखवाडी चऱ्होली येथे मंगलमूर्ती हाईट्स या बांधकाम साईटवर २९ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला. 

भूषण मनोज राठोड (३२, रा. आळंदी देवाची), अमित दत्तात्रय मोहिते (२६, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार अनिल शिंदे यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी येथे मंगलमूर्ती हाईट्स हा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील इमारतीच्या टेरेसवरील दरवाजाच्या सज्जाला योग्य सपाेर्ट दिला नाही. या सज्जावर चढून दोन कामगार प्लास्टर करीत असताना सज्जा कोसळला. त्यावेळी सज्जाखाली काम करत असलेल्या ३६ वर्षीय कामगार महिला जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. कामगार भवरचंद रामादीन डौडे (२५, रा. छत्तीसगड) सज्जावरून पडून गंभीर जखमी झाला. 

भूषण राठोड याने सज्जास सिमेंट काँक्रीटचा योग्य सपोर्ट न दिल्यामुळे तसेच बांधकाम कंत्राटदार अमित मोहिते याने बांधकामाची सुरक्षा व्यवस्था न पुरवल्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार भूषण राठोड आणि अमित मोहिते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Structure collapses at construction site; Woman dies, worker injured pune latest crime