Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:04 IST2018-07-24T13:58:22+5:302018-07-24T14:04:22+5:30
मराठा आरक्षणासाठी बलीदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना पिंपरीत यांना आदरांजली वाहण्यात आली.

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन
पिंपरी :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला पिंपरी-चिंचवड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणासाठी बलीदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना पिंपरीत यांना आदरांजली वाहण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन सुरू केले आहे. त्याच शहरातही प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाज संस्थेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, नकुल भोईर, आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली. काकासाहेबांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
वाहतूकीला अडथळा न करण्याचे आवाहन
श्रद्धांजली वाहिल्यानंतर पदाधिकाऱ्यांन कार्यकर्त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक वाहतूकीला अडथळा होईल, असे कृत्य करू नये, असे जाहिर आवाहन करण्यात आले. तसेच नागरिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहनही करण्यात आले. पिंपरी,चिंचवड, निगडी, थेरगाव, भोसरी परिसरातील काही दुकाने बंद करण्यात आली होती. पिंपरी बाजारातीलही दुकाने बंद होती.