शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अतिक्रमण कारवाईला गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 17:49 IST

अतिक्रमण विभागाकडील सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह टिळक चौक ते सावली हॉटेलच्या दरम्यान असलेल्या सार्वजनिक पदपथावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करत होते.

पिंपरी : अतिक्रमण कारवाईला विरोध करत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आठ ते दहा जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार निगडीतील टिळक चौक येथे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. साईनाथ रामभाऊ खंडीजोड (वय ५५, रा. घरकुल वसाहत, चिखली), अनिल तुकाराम बारवकर (वय ५०, रा. कृष्णानगर, चिंचवड), राम रंगराव बिरादार (वय ३५, रा. नेवाळेवस्ती, चिखली), रणजित प्रभाकर देशमुख (वय २३, रा. चिखली), काशिनाथ नखाते यांच्यासह या परिसरातील इतर हातगाडीचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम परवानगी व अतिक्रमण नियंत्रण निर्मुलन विभागाचे अरुण शामराव सोनकुसरे (वय ५३, रा. अजमेरा हौसिंग कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोनकुसरे हे अ प्रभाग कार्यालयाकडील अतिक्रमण विभागाकडील सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह टिळक चौक ते सावली हॉटेलच्या दरम्यान असलेल्या सार्वजनिक पदपथावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीररित्या लोकांचा जमाव जमवून कारवाईस विरोध केला. सोनकुसरे व त्यांचे कर्मचारी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेEnchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस