शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात ९ आॅगस्टला रेल्वे रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 19:00 IST

क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआदिवासी बहुल कुणेनामा ग्रामपंचायतीचा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा 

लोणावळा : मराठा आरक्षणाच्या मागणी करता सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. ९ आॅगस्ट रोजी होणारे आंदोलन हे अहिंसा व शांततेच्या मार्गाने करण्याकरिता नुकतीच नियोजन बैठक लोणावळ्यात पार पडली. या बैठकीत पुणे ग्रामीणचे नुतन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी देखील मराठा समाजाला मार्गदर्शन करत आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले.   सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण हे गुरुवारी (९ आॅगस्ट) या क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता भाजीमार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित जमणार आहेत. त्याठिकाणी पाच कुमारिका छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात होईल. भाजी मार्केट ते गवळीवाडा नाका, तेथून रेल्वे स्थानक असा मार्ग असेल. रेल्वे स्थानकावर काही काळ घोषणाबाजी व रेल्वे रोको करण्यात येणार आहे.सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होणार आहे. ...............................कुणेनामा ग्रामपंचायतीचा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आदिवासी बहुल ग्रामपंचायत असलेल्या कुणेनामा ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी पूर्ण पाठिंबा दिला असून अशी निवेदने जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार या सर्व शासकीय कार्यालयांना दिली आहे. याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य रामदास पांडवे म्हणाले, कुणेनामा ग्रामपंचायत ही ७० टक्के आदिवासी बहुल असली तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीला आमचा पाठिंबा आहे. 

टॅग्स :lonavalaलोणावळाrailwayरेल्वेMaratha Reservationमराठा आरक्षण