कामशेतला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:06 IST2017-08-02T03:06:36+5:302017-08-02T03:06:36+5:30
पवना बंदिस्त जलवाहिनी संदर्भातील आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकºयांवर अन्यायकारक गुन्हे दाखल केले असून, शासनाने हे सर्व गुन्हे मागे घेऊन शेतकºयाला न्याय मिळावा

कामशेतला रास्ता रोको
कामशेत : पवना बंदिस्त जलवाहिनी संदर्भातील आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकºयांवर अन्यायकारक गुन्हे दाखल केले असून, शासनाने हे सर्व गुन्हे मागे घेऊन शेतकºयाला न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाट्यावर मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी कामशेत शहरातून मोर्चा काढून शेतकºयांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या अशा घोषणा देण्यात आल्या. पवनानगर फाट्यावर येऊन जुना मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बाजूंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे एक तास रोखून धरला. या वेळी पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील शेतकºयांवर अन्यायकारकपणे गुन्हे दाखल झाले आहेत. अद्यापपर्यंत शेतकºयांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. ते तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केली. त्या संबंधीचे निवेदन कामशेत पोलीस प्रशासनाला दिले. या वेळी अशोक गायकवाड उपस्थित होते.