शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पिंपरीत तरुणावर वार करुन हवा भरण्याचा कॉम्प्रेसर चोरला  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 8:00 PM

तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन पंक्चरच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन पंक्चरच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोशी येथे घडली. राजु कांबळे (रा. मोहननगर, पिंपरी), विशाल कांबळे, बाळू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश किशोर लोंढे (वय २०, रा. बोरहाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोंढे यांचे मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील माऊली टी सेंटर शेजारी पंक्चरचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास लोंढे हे त्यांचे मित्र शंकर सुरवसे, विनोद विश्वकर्मा, गोट्या उर्फ पया कचरु ओव्हाळ यांच्यासमवेत  दुकानाजवळ बसले होते. दरम्यान, आरोपी धारदार हत्यारासह त्याठिकाणी आले. तसेच गोट्याच्या भावाने राजु कांबळे याचे रिक्षाचे शिफ्टचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन लोंढे यांच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर मशीन घेवून आरोपी निघाले. त्यावेळी लोंढे यांनी त्यास विरोध केला असता आरोपींनी लोंढे यांच्या डोक्यात, पाठीवर व हातावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करीत १५ हजार रुपये किंमतीचे कॉम्प्रेसर चोरुन नेले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस