चोरीचा प्रयत्न; दोघांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:01 IST2017-08-01T04:01:10+5:302017-08-01T04:01:10+5:30

चंदननगर परिसरातील हार्डवेअरच्या दुकानाच्या खिडकीचे गज कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Stolen attempt; Both of them imprisoned | चोरीचा प्रयत्न; दोघांना कारावास

चोरीचा प्रयत्न; दोघांना कारावास

पुणे : चंदननगर परिसरातील हार्डवेअरच्या दुकानाच्या खिडकीचे गज कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
प्रविण श्रीरंग गायकवाड (वय ३०), योगेश बबनराव शिंगटे (वय २५, दोघेही रा. गणेशनगर, येरवडा) अशी शिक्षा सुनावलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रमेश चैनारामजी चौधरी (वय २७, रा. चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २१ जुलै २००७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी यांचे चंदननगर खराडी परिसरात मयूर हार्डवेअर नावाचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी दुकान कुलूपबंद असताना दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून ते दुकानात शिरले. दुकानातील साहित्याची चोरी करताना आढळून आले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.
याप्रकरणात सरकारी वकील वामन कोळी यांनी दोन साक्षीदार तपासले. त्यामध्ये, फियार्दी व एका प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वाची ठरली. ती ग्राह्य धरत जी. के. नंदनवार यांच्या न्यायालयाने आरोपींना चार महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पोलीस नाईक राहुल शिंदे यांनी सहकार्य केले.

Web Title: Stolen attempt; Both of them imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.