पिंपरी : सोनसाखळी, इतर दागिने, मोबाइल फोन, कॅमेरा असा चोरीला गेलेला ऐवज मूळ मालकांना परत मिळाला. २९ वेगवेगळ्या गुन्ह्यांत चोरट्यांनी चोरून नेलेला ४७ लाख ७७ हजार ५९९ रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते नागरिकांना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. त्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येऊन पोलिसांचे आभार मानण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ''पोलीस रायझिंग डे ''निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे - २) श्रीधर जाधव, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
चोरीला गेलेला ४७ लाखांचा ऐवज मूळ मालकांना मिळाला परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:22 IST
४७ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल नागरिकांना प्रदान
चोरीला गेलेला ४७ लाखांचा ऐवज मूळ मालकांना मिळाला परत
ठळक मुद्देपिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ''पोलीस रायझिंग डे ''निमित्त कार्यक्रमाचे आयोजन