शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

स्थायी समिती अध्यक्षपद : भाजपाच्या ममता गायकवाड विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:27 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी दुपारी झाली. भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची अध्यक्षपदी वर्णी लागली असून ११ मतांनी त्या निवडून आल्या. गायकवाड या स्थायी समितीच्या ३४ व्या अध्यक्षा आहेत.

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी दुपारी झाली. भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची अध्यक्षपदी वर्णी लागली असून ११ मतांनी त्या निवडून आल्या. गायकवाड या स्थायी समितीच्या ३४ व्या अध्यक्षा आहेत.महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी आमदार जगताप यांच्या गटाची सरशी झाली. गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे गट आक्रमक झाला होता. समर्थकांनी बंडाचे निशान फडकावले होते. याच फुटीचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मोरेश्वर भोंडवे यांनाही रिंगणात उतरविले होते. त्यांना शिवसेना आणि मनसेनेही पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपातील गटबाजीचा फायदा उठविणार का? बंडखोरीचा अध्यक्षपद निवडीवर काय परिणाम होणार? याबाबत उत्सुकता होती.बुधवारी दुपारी बाराला अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी काम पाहिले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी निवडणुकीची प्रक्रिया समजावून सांगितली. निवडणूक असल्याने भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे महापालिकेत ठाण मांडून होते.राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक झाली. ममता गायकवाड यांना ११ व भोंडवे यांना चार मते पडली. शिवसेना तटस्थ राहिली. माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी ममता यांना पेढा भरविला. या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सत्कार झाला. उपमहापौर शैलजा मोरे, एकनाथ पवार, सीमा सावळे आदी उपस्थित होते.प्रलंबित प्रकल्पांना गती देणार१पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर देणार असून, नवीन विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे. विविध लोकाभिमुख प्रकल्प राबविणार आहे, असे मत नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी व्यक्त केले.२ महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत गायकवाड विजयी झाल्या. त्या मूळच्या साताºयाच्या असून माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी आहेत. दहावीपर्यंत शिक्षण झाले असून महापालिकेत प्रथमच निवडून आल्या आहेत. महिला बचत गट, आर्थिक मागासांना मदत, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रयत्न केले आहेत. पथारीवाल्यांसाठी मंडईची स्थापना केली आहे.३रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मॉडेल वॉर्ड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, पाणीटंचाई सोडविणे, कचºयाचा प्रश्न सोडविण्यात आग्रही राहिलेल्या असून चोवीस तास पाणीपुरवठा आणि स्थापत्यविषयक कामांवर भर देणार असल्याचे सांगितले.४गायकवाड म्हणाल्या, ‘‘भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो मी सार्थ करून दाखविणार आहे. पारदर्शक आणि प्रामणिकपणे काम करण्यावर माझा भर असणार आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. आगामी काळात शहरात विविध लोकाभिमुख प्रकल्प राबविणार आहे.’’मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवादपिंपरी : स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत चिंचवड विरुद्ध पिंपरी असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली.मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांशी थेट संवाद साधला. त्यामुळे बंड थंड झाले. सत्ताधारी भाजपाच्या १० आणि एका अपक्ष नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री दूरध्वनी केला. अधिकृत उमेदवाराला मतदान करावे, अशा सूचना केल्या. त्यामुळे अध्यक्षपदासाठी डावलल्याने राजीनामा देणारे राहुल जाधव, शीतल शिंदे यांनीही निवडणुकीत सहभागी होऊन पक्षाच्या बाजूने मतदान केले. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने आणि आमदार लक्ष्मण जगतापाची मुत्सदीगिरीने भाजपाचा उमेदवार विजयी झाल्याची चर्चा होती.बिनविरोध निवडीचा डाव पाडला हाणूनपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तो राष्टÑवादी काँग्रेसने हाणून पाडला. भाजपाच्या कारभारावर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी टीका केली आहे. ‘सत्ताधारी भाजपा सभागृह लोकशाही पद्धतीने चालवत नाहीत. हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. भाजपाच्या या हुकूमशाही, दडपशाहीचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने स्थायी अध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही.स्थायी समिती अध्यक्षपदाची बुधवारी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे स्थायीत चार सदस्य असताना देखील राष्ट्रवादीने उमेदवार उभा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर बहल यांनी पक्षाची भूमिका सांगितली आहे. भाजपाच्या सभागृहातील हुकूमशाहीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने ही स्थायीची निवडणूक लढविल्याचे स्पष्ट केले आहे.सभेतील गोंधळाला सत्ताधारी भाजपा जबाबदार आहे. या विषयाला आमच्यासह सर्वंच विरोधकांनी विरोध दर्शविला होता. विरोधकांचा विरोध न नोंदविता गोंधळामध्ये या विषयाची उपसूचना न स्वीकारता पाणीपुरवठ्याचा विषय मंजूर केला. अशाप्रकारे सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडविले गेले आणि प्रशासनसुद्धा याची पाठराखण करते, असा आरोप बहल यांनी केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा