शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सेंट अ‍ॅन्ड्र्यूज हायस्कूल प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 1:05 AM

थ्रो बॉल स्पर्धा : सिटी प्राइड स्कूल, एसएसडी गणगे प्रशालेचेही यश

पिंपरी : महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात चिंचवड येथील सेंट अ‍ॅन्ड्र्यूज हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला. इंद्रायणीनगर, भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आयोजित या स्पर्धेत ३२ शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धाप्रमुख आशा ढवळे, आत्माराम महाकाळ, सुभाष जावीर, युवराज गवारी, बाळासाहेब काळभोर, कमलाकर कांबळे यांनी संयोजन केले. वैभव थिटे, अक्षय इंगवले, यश जोशी, शोएब शेख, सिद्धी बेनगुडे यांनी पंच म्हणून कामकाज पाहिले. राजेंद्र मागाडे पंचप्रमुख होते. पुणे जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनचे सचिव कमलाकर डोके उपस्थित होते.

निकाल : पहिल्या उपांत्य फेरीत सिटी प्राइड स्कूल व ज्युनियर कॉलजने कृष्णानगर येथील एसएसडी गणगे प्रशालेचा पराभव केला. विजयी संघाकडून दिया लसारिया, जान्हवी राणे, अश्विका कुशवाह यांनी, तर पराभूत संघाकडून ऋतुजा निकम, स्वाती दोंड, दृष्टी पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत चिंचवडच्या सेंट अ‍ॅन्ड्र्यूज हायस्कूलने निगडीतील सीएमएस इंग्लिश मीडिअम स्कूलचा पराभव केला.

तृतीय क्रमांकासाठी कृष्णानगर येथील एसएसडी गणगे प्रशाला व सीएमएस इंग्लिश स्कूल यांच्यात लढत झाली. यामध्ये एसएसडी गणगे प्रशालेने विजय मिळविला. अंतिम लढतीत सेंट अ‍ॅन्ड्र्यूज हायस्कूलने सिटी प्राइड स्कूलचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी संघाकडून मानसी साबळे, अल्फिया पठाण, जिंदल इशिता यांनी, तर पराभूत संघाकडून दिया लसारिया, जान्हवी राणे, आस्था नायर यांनी चमकदार कामगिरी केली.पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तर थ्रोबॉल स्पर्धेत १९ वर्षे मुलांच्या गटात निगडीतील सिटी प्राइड स्कूल व ज्युनियर कॉलेजने यश संपादन केले. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आयोजित या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग नोंदविला. आशा ढवळे, आत्माराम महाकाळ, सुभाष जावीर, युवराज गवारी, बाळासाहेब काळभोर, कमलाकर कांबळे यांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत निगडीतील सिटी प्राइड स्कूल व ज्युनियर कॉलेजने प्रेरणा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून निहार अहिरे, आल्हाद मराठे, रोशन मॅथ्यू यांनी, तर पराभूत संघाकडून राहुल धंद्रे, अजय कामनळे, संतोष साबळे यांनी उत्कृष्ट खेळ केला.४दुसºया उपांत्य फेरीत पिंपरीतील जयहिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूलचा पराभव केला. विजयी संघाकडून दानिश दत्ताल, अमित टेकाळे, विनीत नाणेकर यांनी, तर पराभूत संघाकडून श्लोक पाडळे, भास्कर राव यांनी उत्तम कामगिरी केली.तिसºया क्रमांकासाठी प्रेरणा हायस्कूल व इंदिरा नॅशनल स्कूल यांच्यात झालेल्या लढतीमध्ये प्रेरणा हायस्कूलने विजय मिळविला. यासह अंतिम सामना सिटी प्राइड स्कूल व ज्युनियर कॉलेज, तसेच जयहिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यात लढत झाली. यामध्ये सिटी प्राइड स्कूलने विजय मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी संघाकडून निहार अहिरे, आल्हाद मराठे, रोशन मॅथ्यू यांनी, तर पराभूत संघाकडून दानिश दलाल, अमित टेकाळे, विनीत नाणेकर यांनी चमकदार कामगिरी केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड