शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 5, 2015 03:15 IST

येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी

देहूगाव : येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी नक्की कोण असणार याचा फैसला होणार आहे.उमेदवारसमर्थक व घरातील सुवासिनींनी मतदान यंत्राची पूजा करून मतदानाला सुरुवात केली. पहिल्या दोन तासांतच उमेदवारांच्या घरातील मतदारांनी व जवळच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेतले. काही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन करीत होते. त्यामुळे पहिल्या दोन तासांतच मतदानाचा वेग चांगला होता. दहाच्या सुमारास वॉर्ड क्रमांक तीन, पाच व सहामध्ये काहीसे मंद गतीने मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाचा वेगही मंदावला होता आणि मतदान कर्मचारी मतदारांची वाट पाहत असल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदार खऱ्या अर्थाने घराबाहेर पडले आणि मतदान केंद्रांच्या बाहेर रांग लागण्यास सुरुवात झाली. काही उमेदवार १०० मीटर अंतराच्या आत, तर काही उमेदवारांचे समर्थक मतदान इमारतीच्या परिसरात उभे राहून मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत होते. पोलिसांना बंदोबस्तासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. काही कार्यकर्ते वॉर्डातील वयस्कर लोकांना आणत होते, मतदान केंद्र लांब असल्याने काही कार्यकर्ते वाहने घेऊन आणण्याचे काम करीत होते. मतदारांना मतदान स्लिप देण्यासाठी मतदान बूथवर लॅपटॉप, मोबाईल या साधनांचा वापर करून तत्काळ मतदारयादीचा नंबर व खोली क्रमांक देत होते. विठ्ठलनगरमधील पाच व सहा वार्डमध्ये उमेदवारही अनुक्रमे १७ व १४ होते. त्यामुळे त्यांचे देहू-आळंदी रस्त्यावर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ रस्त्याच्या कडेला टाकलेले असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने वाहतुकीची दिवसभर कोंडीच होती. त्यामुळे वाहतुकीचा बोजबारा उडाला होता. दुपारच्या वेळी सर्वच उमेदवारांच्या बूथमधीलकार्यकर्त्यांना व मतदान प्रतिनिधींना नाष्टा पुरविण्याचे काम करत होते. मतदानाची वेळ संपत आली तशी उमेदवारांची मतदान करून घेण्यासाठी तगमग सुरू झाली. परिणामी चार वाजल्यानंतर वार्ड क्रमांक २, तीनच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांनाही मतदानप्रक्रिया, वाहतूक व्यवस्था, कार्यकर्त्यांना आवर घालणे हे जिकिरीचे होत होते. प्रशासकीय यंत्रणाही सतर्क होती. (वार्ताहर)