शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Pune | प्रेयसीविषयी अपशब्द वापरला म्हणून मुलाने केला बापाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 21:40 IST

ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडली...

पिंपरी : प्रेयसीविषयी वडिलांनी अपशब्द वापरत शिवी दिली, याचा राग मनात धरून दोरीने गळा आवळून मुलाने वडिलांचा खून केला. तर, मुलाच्या आईने आणि मोठ्या भावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. ५) सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव अशोक रामदास जाधव (वय ४५) असे आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक काशीनाथ खंडाळे यांनी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मृताची पत्नी हिच्या विरोधात गुन्हा दाखल करत मुलगा राहुल अशोक जाधव (वय २५), अनिल अशोक जाधव (वय २३) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीविषयी त्याचे वडील मयत अशोक जाधव यांनी वाईट शब्द उच्चारले. याचा राग मनात धरून घरातील दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. खून करताना अशोक यांच्या नाकातोंडातून फरशीवर रक्त पडले. रक्ताचे डाग महिला आरोपीने अशोक यांच्या अंगातील शर्टाने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर, आरोपी राहुल याने घराचे दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा बनाव रचला, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस