शहराच्या काही भागात शनिवारी नाही पाणी

By Admin | Updated: October 30, 2015 00:18 IST2015-10-30T00:18:49+5:302015-10-30T00:18:49+5:30

रस्त्याच्या कामासाठी जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार असल्याने शनिवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Some areas of the city do not have water on Saturday | शहराच्या काही भागात शनिवारी नाही पाणी

शहराच्या काही भागात शनिवारी नाही पाणी

पिंपरी : रस्त्याच्या कामासाठी जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार असल्याने शनिवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
चिंचवड, केएसबी चौक येथील मुख्य गुरुत्व जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार असून, ही जलवाहिनी जोडण्याचे काम शनिवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे यशवंतनगर, गवळीमाथा, टेल्को कॉलनी, उद्यमनगर, महात्मा फुले झोपडपट्टी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, महेशनगर, गांधीनगर, खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी या भागातील पाणीपुरवठा शनिवारी सायंकाळी बंद ठेवण्यात येणार आहे, तर रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Some areas of the city do not have water on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.