शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुनावळे येथील घनकचरा प्रकल्प रद्द करणार : मंत्री उदय सामंत

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 18, 2023 16:38 IST

नागरिकांचा आणि शाळांचा या प्रकल्पाला मोठा विरोध

पिंपरी : पुनावळे येथे महापालिकेचा प्रस्तावित घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प त्वरित रद्द करून तो इतर ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे कचरा डेपो उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. त्या विरोधात मागील ३ महिन्यापासून पुनावळे येथील रहिवासी आणि ग्रामस्थांनी मोठा विरोध चालवला होता. कचरा डेपो विरोधात निदर्शने, आंदोलने करण्यात आली, तसेच पुनावळे कचरा डेपो बाबत आमदार अश्विनी जगताप यांनी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत बोलतांना मंत्री उदय सामंत यांनी कचरा डेपो त्वरित रद्द करून लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन येईल दिले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले, पुनावळे गाव १९९८ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावेळी १८ गावांचा डी.पी. देखील तयार करण्यात आला आहे. शहरतील लोकसंख्या वाढीनुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी २६ हेक्टर जागा महापालिकेने देण्याचे ठरवले. त्यापैकी २२.८ हेक्टर जागा ही वनखात्याची होती. बाकी जागा ही खाजगी होती. वनखात्याच्या अटीनुसार वनखात्याला पर्यायी जागा देण्याचे ठरले होते.

मुळशी व चंद्रपूर येथील जागा वनखात्याला पसंत पडली नाही. तसेच पुनावळे येथे मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तेथील नागरिकांचा आणि शाळांचा या प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुनावळे येथे उभारणे अशक्य आहे. त्यासाठी पर्यायी जागा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकार