बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:46 IST2018-05-14T20:46:53+5:302018-05-14T20:46:53+5:30
बोपखेल येथे राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी 12 वाजता घडली. रामूसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.

बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ
पिंपरी : बोपखेल येथे राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी 12 वाजता घडली. रामूसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मूळचा मध्य प्रदेशातील असून सीएमई मध्ये शिपाई म्हणून कामाला होते. पतीने आत्महत्या केलेली पाहून पत्नीची शुद्ध हरपली. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.