शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना सोशल मीडियाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 06:26 IST

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगण्यामुळे अल्पवयातच नैराश्य घेरू लागले आहे. नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक

पिंपरी : सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगण्यामुळे अल्पवयातच नैराश्य घेरू लागले आहे. नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या असोत; त्यांच्याशी दोन हात करण्यापेक्षा आपले जीवन संपवणे अधिक सोपे वाटू लागले आहे. नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेल्यांशी वेळीच संवाद साधला गेला आणि त्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले तर अनेकांचं जगणं पुन्हा सुंदरतेकडे वळू शकेल. नेमका हाच विचार घेऊन सध्या ‘नेटकरी’ मंडळींनी फेसबुकद्वारे आश्वासक आधार द्यायला सुरुवात केली आहे.आत्महत्या प्रतिबंध जागरूकता, तुम्ही एकाकी नाही, तुमच्याबद्दल मला आस्था आहे. अशा ‘हॅश टॅग’सह फेसबुकवरुन नैराश्यग्रस्तांना प्रेमाचा हात देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आलेला आहे. सोशल मीडियाद्वारे चांगला असो अथवा वाईट असो कोणताही संदेश काही क्षणांतच सर्वदूर पोचवणे सोपे झाले आहे. जगभरामध्ये आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानसिक आरोग्य जागरुकता सप्ताह पाळला जातो. अमेरिकेच्या संसदेने ठराव करुन १९९0 साली या सप्ताहाला सुरुवात केली. अमेरिकेतील ‘नॅशनल अलायन्स आॅन मेंटल इलनेस’ या संस्थेने मानसिक रुग्णांबाबत समाज शिक्षण आणि बदलासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. भारतामध्येही विविध राज्यांमध्ये हा सप्ताह पाळला जातो.अलीकडच्या काळात मानसिक आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच नैराश्य येण्याच्या प्रमाणातही कमालिची वाढ होत चालली आहे. मानसिक औदासीन्य वाढण्यासाठी आसपासची परिस्थिती कारणीभूत ठरत असली तरी एकमेकांमधला संवाद, समजूतदारपणा, सहनशीलता आणि संवेदनशीलता कमी होत चालली आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार, २०२० साली औदासीन्याचा दबाव पूर्ण जगात दुसºया क्रमांकावर असेल. विकसित आणि विकसनशील देशांच्या उपचाराक्षमतेपेक्षाही रुग्णांची संख्या अधिक होण्याची भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केलेली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. मानसिक औदासीन्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार उद्भवू शकतात. संवादाच्या अभावामधून या घटना वाढत चालल्या आहेत. खरोखरीच जर अशा नैराश्याने घेरलेल्या व्यक्तींशी संवाद साधला गेला, त्यांना प्रेमाचा आणि आपुलकीचा स्पर्श झाला तर कदाचित त्यांना जीवन संपविण्यापासून वाचविण्यात यश येऊ शकेल.काय आहे मेसेज‘माझ्या घराचे दार उघडे आहे. घर सुरक्षित आहे. काही क्षणात तुम्हाला चहा, कॉफी मिळेल. स्वयंपाकघराच्या ओट्याचे कोणतेही पूर्वग्रह नाहीत, तिथे शांती नांदते. ज्याला कोणाला बोलायचंय त्याच्याशी गप्पा मारायला मी सदैव तयार आहे. एकेकटे सोसत बसू नका. घरात अन्न, चहापाणी आहे, तुमचं ऐकून घ्यायला उत्सुक कान आहेत. रडायला खांदा आहे. तुमचं माझ्या घरात स्वागत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात या काही जुन्या गोष्टी आपण विसरत आहोत. फक्त एखादा एसएमएस, इमोजी किंवा व्हिडीओ चॅट आपल्या जिवलगांना वेळ देण्यासाठी, काळजी घेण्यासाठी पुरेसा नाही! किमान एक मित्र, मैत्रीण हे कॉपी करून स्वत:च्या वॉलवर रिपोस्ट करेल का? कृपया नुसते शेअर करू नका. जगात तुम्ही कधीही खरोखर एकाकी नाही हा संदेश पोहोचायला हवा.’फेसबुकवर मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताहानिमित्त हा मेसेज आमच्या वाचनात आला. अलीकडच्या काळात महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. महिलांसाठी आम्ही सुरु केलेल्या ‘मैत्र’ व्यासपीठावरुन याबाबत सतत संवाद साधला जात आहे. मैत्रच्या फेसबुक पेजसह सर्व सभासद महिलांनी स्वत:च्या पेजवर हा मेसेज कॉपी पेस्ट केला आहे. तसे आवाहन आम्ही केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून संवादामधून अनेकांना आपण मानसिक, भावनिक आधार देऊ शकू असे वाटते.- मेधा पुरकर, संचालिका, मैत्र 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटर