शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

वाल्हेकरवाडीत सहा एकर ऊस जळून खाक; सुमारे आठ-दहा लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 1:53 PM

वाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ६ एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देदोन अग्निशामक विभागाचे बंब आणि नागरिकांनी मिळून विझवली आग जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान, ऊसाच्या सुकलेल्या पाचोळ्यांमुळे वाढली आग

रावेत : वाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ६ एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी (दि. २६) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन अग्निशामक विभागाचे बंब आणि नागरिकांनी मिळून लागलेली आग विझवली.

वाल्हेकरवाडी येथील सर्वे क्र. ४७मध्ये  असलेल्या हॉटेल रानमळाशेजारी असणाऱ्या भागातील सुरेश चिंचवडे यांचा अडीच एकर, बाळासाहेब चिंचवडे यांचा अडीच एकर, हनुमंत चिंचवडे यांचा एक एकर असा एकूण सहा एकरच्या आसपास ऊस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जोराचा वारा असल्याने लागलेली आग सर्वत्र पसरली. ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात सर्वत्र पसरलेला ठिबक सिंचन आगीत जळून खाक झाल्याने जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. ऊसाच्या सुकलेल्या पाचोळ्यांमुळे ही आग क्षणातच वाढत गेली. शेजारी असलेल्या ऊसांमध्ये ही आग पसरत गेली. 

आगीच्या घटनेची माहिती मिळताच ब प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिंचवडे, संकेत चिंचवडे, शेखर चिंचवडे युथ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर आदी सह कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप पाहता ती वाढून इतरत्र पसरू नये या करिता सर्वांनी तत्काळ अग्निशामक यंत्रणा येईपर्यंत उपलब्ध असलेल्या पाण्यानी आग विजविण्याचा प्रयत्न केला.

अज्ञाताची अग्निशामक विभागाच्या गाडीवर दगडफेक शेतातील उसाला लागलेली आग विझवण्यासाठी तात्काळ पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या आणि आग विझविण्यास सुरवात केली रस्ता अरुंद आणि कच्चा तसेच रस्त्याच्या वरती महावितरणच्या यंत्रणेची वीजवाहक लोबणाऱ्या  तारांचे जाळे यामुळे बंब फिरविणे जिकरीचे होत होते. एक बंब फिरवीत असताना मागील चाक मातीत रुतून फसला. त्यामुळे एकच बंब आग विझवीत होता. आग विजविण्यासाठी अग्निशामक दलास येण्यास उशीर झाल्याने, एक बंब फसल्याने आणि एकातील पाणी संपल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत असताना पाणी संपल्याने दुसरे पाणी आणण्यासाठी निघाल्यावर येथे जमलेल्या घोळक्यातील तीन ते चार अज्ञातांनी अग्निशामक गाडीवर दगड फेक केली.  त्यामुळे गाडीचे पुढील दोन्ही काच फुटल्या तणावाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे पाहून अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ चिंचवड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविली लागलीच घटनास्थळी चिंचवड पोलीस स्टेशनचे जवळपास २० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पोहोचून परस्थिती नियंत्रणात आणली. नुकसानग्रस्त गाडीचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. बऱ्याच वेळाने पालिकेचे ४ अग्निशामक बंब घटनास्थळी आले, परंतु तोपर्यंत नागरिकांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड