शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 2:56 AM

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड पोलीस ठाण्यात ११ फेबु्रवारी २०१८ ला एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

पिंपरी : शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह वाकड पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या आरोपींकडून ३ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. राजू बाबूराव जावळकर (वय ५०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे), सोमनाथ सुभाष चौधरी (वय ३२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड पोलीस ठाण्यात ११ फेबु्रवारी २०१८ ला एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये छोटा टेम्पो (एमएच १२, एफडी ६४२३) चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील टेम्पो खेड शिवापूर येथे असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, एका शेडमध्ये हा टेम्पो आढळून आला. त्या वेळी हे दोन आरोपी हा टेम्पो गॅस कटरच्या साहाय्याने कापत असल्याचे दिसून आले. आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो रहाटणी, बीआरटी रोडवरून चोरी केल्याचे सांगितले.अनेक गुन्हे उघडकीसअटक केलेले दोन्ही आरोपी सराईत असून, यातील राजू जवळकर याच्यावर पुणे शहर, सातारा, अहमदनगर येथे शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तर सोमनाथ चौधरी याच्यावर २० ते २५ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन यासह वाकड, इंदापूर, चाकण, तळेगाव दाभाडे, कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.वाहने केली जप्तआरोपी वाहन चोरल्यानंतर ते सुरुवातीला निर्जनस्थळी नेऊन ठेवत. वाहनामध्ये जीपीएस यंत्रणा असल्यास वाहनमालक अथवा पोलीस त्या वाहनापर्यंत पोहोचण्याची वाट पाहायचे. दोन-तीन दिवसांत कोणीही त्या वाहनापर्यंत न पोहोचल्यास ते वाहन स्क्रॅप करण्यासाठी घेतले जात असे. दरम्यान, या आरोपींकडून रहाटणी येथून चोरलेला छोटा टेम्पो, क्रेन जप्त केली आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड