शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भोसरीत रंगणार श्रावण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:38 AM

 ‘श्रावण आला श्रावण, मन हरवून अन् घन बरसून तो आला, श्रावण आला श्रावण’ असे श्रावणाचे वर्णन केले जाते. हिरव्या निसर्गाचा शालू पांघरलेल्या धरणीचा साजशृंगार श्रावण महिन्यात अधिक बहरतो.

पिंपरी - ‘श्रावण आला श्रावण, मन हरवून अन् घन बरसून तो आला, श्रावण आला श्रावण’ असे श्रावणाचे वर्णन केले जाते.हिरव्या निसर्गाचा शालू पांघरलेल्या धरणीचा साजशृंगार श्रावण महिन्यात अधिक बहरतो. सणवार, व्रतवैकल्ये, पूजा-अर्चना याचसोबत पारंपरिक खेळांची धमाल लहान-थोरांना पवित्र वातावरणात घेऊन जाते. म्हणूनच या श्रावण महिन्यात परंपरेचा आणि मनोरंजनाचा सुरेख मेळ साधून लोकमत सखी मंच व कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सच्या वतीने ‘श्रावण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार, दि. २० आॅगस्ट रोजी कैै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे सकाळी ११.३० वाजता होत असून, या निमित्ताने खास विविध स्पर्धा, खेळ, मनोरंजन याचसोबत स्टार प्रवाहच्या मालिकेतील कलाकार अनिकेत केळकर आणि कीर्ती मेहेंदळे यांच्याशी गप्पाटप्पा असा भरगच्च कार्यक्रम या श्रावण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.यात प्रामुख्याने स्टार प्रवाहची महाराणी, सखी श्रावण क्वीन, पूजाथाळी सजावट, नऊवारी फॅशन शो, उखाणे, मेहंदी, हेअर स्टाईल स्पर्धा आणि मंगळागौर स्पर्धा अशा वेगळ्या स्पर्धांचा समावेश असून, विजेत्या सखींना पुरस्कारांनी गौरविले जाईल.मनोरंजनाच्या झालरीसह हा परंपरेचा वारसा सखींना वेगळाच आनंद देणार आहे. या सोहळ्याचे सहप्रस्तुतकर्ता स्टार प्रवाह असून कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स प्रस्तुत व फॉर्चून वास्तूशिल्प डेव्हलपर्स हे गिफ्ट स्पॉन्सर आहेत. तसेच स्टार प्रवाहवरील नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाहाच्या ‘ललित २०५’ या मालिकेत प्रमुख भूमिका निभावणारे अनिकेत केळकर व कीर्ती मेहेंदळे यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.या स्पर्धेत भाग घेण्याकरता आणि विजेती होण्याकरता बघत राहा स्टार प्रवाह. भरगच्च विविध स्पर्धांनी आणि बक्षिसांनी नटलेला असा हा श्रावण सोहळा राहणार आहे. मोठ्या संख्येने सखींनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.बक्षिसांची संधीस्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सखींनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. हेअर स्टाईल व मेहंदी स्पर्धेसाठी लागणारे मॉडेल व मेहंदी कोन स्पर्धकांनी आणावेत. सखी श्रावण क्वीन स्पर्धेमध्ये पानफुलांनी तयार केलेले दागिने परिधान करावे. उखाणा स्पर्धेमध्ये एकच उखाणा सादर करावा. पूजा थाळी घरुन तयार करुन आणावी. स्टार प्रवाहाची महाराणी स्पर्धा तीन फेºयांमध्ये होईल. स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य. सखींनी हिरवी साडी / ड्रेस व नथ परिधान करुन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा. एका ओळखपत्रावर एक प्रवेशिका मिळेल. २०१८ सखी मंच ओळखपत्र आवश्यक.माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : स्टार प्रवाहाची महाराणी (९१४६२७१६१०), मेहंदी (९०११२२१२०७), सखी श्रावण क्वीन (८५५१०२००५९),पूजा थाळी सजावट (८६०५९७२२७२), नऊवारी फॅशन शो (९८८१६७०१५४), उखाणे (९८९०९६६१६७), हेअर स्टाईल स्पर्धा (८३२९०२३५४४), मंगळागौर स्पर्धा (८८६२०३०८००)सखींनी हिरवी साडी व नथ परिधान करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या