शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

रेशन कार्यालयावर दुकानदारांचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:27 AM

निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात रेशनिंग दुकानदारांनीच कब्जा केला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामेही थेट दुकानदारच केबिनमध्ये बसून करतात.

- मंगेश पांडे पिंपरी : निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात रेशनिंग दुकानदारांनीच कब्जा केला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामेही थेटदुकानदारच केबिनमध्ये बसून करतात. अधिकाºयांच्या केबिनसह रेकॉर्ड रूमही या दुकानदारांसाठी खुल्या असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत दुकानदारांकडे असलेल्या शिधापत्रिका व त्यामध्ये नमूद असलेल्या व्यक्तींच्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानदारांना वितरणासाठी धान्य दिले जाते. यासाठी शिधापत्रिकेतील माहितीच्या संगणकीकरणासह आधार जोडणी आवश्यक आहे. आधारनोंदणी बंधनकारक केल्याने धान्य देण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्यासह आधार जोडणीचे काम जोरात सुरू आहे. या कामकाजासाठी संगणकाला काही लॉग इन व पासवर्ड दिलेले आहेत.विशेष कामकाजासाठी कार्यालयामार्फत काही कर्मचाºयांची नेमणूक करणेही आवश्यक आहे. मात्र, निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात थेट दुकानदारांनी संगणकाचा कब्जा घेतला आहे. कार्यालयातील कर्मचारी अथवा कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या कर्मचाºयांऐवजी दुकानदारच हे काम करीत असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दिसून आले. त्यामुळे रेशनिंगवरील कुटुंबांच्या नावातील चुका, दुबार नावे व बोगस नोंदणीची शक्यता आहे.>पासवर्ड होताहेत सार्वजनिकनिगडीतील संत तुकाराम व्यापार संकुल येथे असलेल्या परिमंडळ कार्यालय ‘अ’ अंतर्गत देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आदी भाग येतो, तर ‘ज’ अंतर्गत पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, मोहननगर, खराळवाडी आदी भाग येतो. या परिसरातील शिधापत्रिकेशी संबंधित कामकाज या कार्यालयात चालते. कार्यालयातील संगणकाला लॉग इन आयडी, पासवर्ड देण्यात आले आहेत. त्यामुळे येथील माहिती सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, येथील संगणकांचा वापर कर्मचाºयांव्यतिरिक्त कोणीही करीत असल्याने संगणकाचे पासवर्डही सार्वजनिक होत आहेत.रेकॉर्ड रूम वाºयावरया कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली असतात. या ठिकाणच्या कागदपत्रांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. मात्र, येथील रेकॉर्ड रूम म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ बनले आहे. कोणीही या रेकॉर्ड रूममध्ये शिरकाव करीत आहे. मात्र, कार्यालयातील कर्माचारी, अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले. अधिकारी कोण, कर्मचारी कोण आणि रेशन दुकानदार कोण याबाबत माहिती नसल्याने एखाद्या कामासाठी कार्यालयात येणाºया नागरिकांचा गोंधळ उडतो. दुकानदारच अधिकाºयांच्या केबिनमध्ये बसत असल्याने नागरिकही त्यांच्याकडे जाऊनच माहिती विचारतात. तेव्हा ते एजंटांना भेटण्यासाठी सांगतात.कार्यालयातील संगणकावर शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्याचे काम केले जाते. कार्यालयीन कर्मचारी, तसेच आॅपरेटरमार्फत हे काम सुरू असते. दुकानदारांकडील पॉस मशिनमध्ये काही समस्या असल्यास कार्यालयात येऊन संगणकावर माहिती अपलोड करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाते.- संजना आंबोळे, सहायक परिमंडळ अधिकारी>मंगळवार, दि. १७ जुलै २०१८, दुपारी १:०५ :शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्यासाठी कार्यालयातील हॉलमध्ये तीन संगणक, परिमंडळ अधिकाºयांच्या कार्यालयात दोन संगणक, तर रेकॉर्ड रूममध्ये एक संगणक ठेवण्यात आला आहे. या संगणकांवर कामकाज सुरू असते. कार्यालयाच्या हॉलमध्ये असलेल्या दोन संगणकांसमोर दोन महिला बसल्या होत्या. यासह परिमंडळ अधिकाºयांच्या केबिनमधील दोन संगणकांपैकी एका संगणकावर कंत्राटी कर्मचारी, तर दुसºया संगणकावर एक व्यक्ती होती. शेजारीच असलेल्या रेकॉर्ड रूममध्येही एक संगणक असून, येथील संगणक दुकानदार हाताळत असल्याचे चित्र दिसून आले.