व्यायामशाळा साहित्याची दुप्पट दराने खरेदी

By Admin | Updated: July 28, 2015 00:46 IST2015-07-28T00:46:48+5:302015-07-28T00:46:48+5:30

महापालिकेने संभाजीनगर उद्यानातील व्यायामशाळेसाठी थेट पद्धतीने व दुप्पट दराने साहित्यांची खरेदी केली जाणार असून, साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविता

Shop at twice the rate of gymnasium | व्यायामशाळा साहित्याची दुप्पट दराने खरेदी

व्यायामशाळा साहित्याची दुप्पट दराने खरेदी

पिंपरी : महापालिकेने संभाजीनगर उद्यानातील व्यायामशाळेसाठी थेट पद्धतीने व दुप्पट दराने साहित्यांची खरेदी केली जाणार असून, साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविता येऊ नये काय, दुप्पट दराच्या खरेदीमागील गौडबंगाल काय, असा प्रश्न नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी केला आहे. करदात्यांचे पैसे संबंधितांकडून वसूल करावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने साहित्य खरेदी करण्याचा धडाका लावला आहे. शिलाई मशिन, नोटा मोजणे, सोनोग्राफी मशिननंतर आता व्यायामशाळेतील साहित्य खरेदीतही गैरव्यवहार होत असल्याचे सावळे व शेडगे यांनी उघडकीस आणले आहे. सावळे म्हणाल्या, ‘‘संभाजीनगर येथील व्यायामशाळेसाठी पक्षनेत्या मंगला कदम यांनी १६ मे रोजी आयुक्तांना एकाच वेळी दोन वेगवेगळी पत्रे पाठवून व्यायामसाहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पत्रासोबत ट्रेड मिल दोन नग, इलिप्टिकल्स दोन नग, अपराइट बाइक दोन नग, वेट मशिन दोन नग, योगा मॅट ३० नग, ट्यूस्टर हेवी ड्यूटी एक नग, डंबेल्स रॅक एक नग, सोनी म्युझिक सिस्टिम पेन ड्राइव्हसह एक नग आदी साहित्यांची यादी त्यांनी जोडली. पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी क्रीडा अधिकाऱ्याने साहायक आयुक्तांना पत्र पाठवून व्यायामशाळेसाठी भांडार विभागाकडे साहित्याची मागणी नोंदविणे राहून गेल्याचे म्हटले आहे. साहित्याची खरेदी करावी, असे त्यात नमूद केले.
त्यानंतर पुरवठादारांकडून दरपत्रक मागविले. त्यामध्ये आकुर्डीतील पुरवठादाराने कमी दराचे दरपत्रक दिले आहे. या दरपत्रकानुसार साहित्यांची एकूण किंमत चार लाख रुपये होते. तीन लाखांपेक्षा जास्त खरेदी करावयाचे झाल्यास निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. त्यामुळे क्रीडा विभागाने या साहित्यांच्या खरेदीसाठी दोन वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्याची शाळा केली.(प्रतिनिधी)

Web Title: Shop at twice the rate of gymnasium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.