शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शेतात आढळले सात दिवसांचे स्त्री अर्भक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 17:16 IST

फांद्या आणि काटेकुटे बाजूला करून पांढरे कापड बाहेर काढले असता सात ते आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले....

ठळक मुद्देअज्ञात पालकांवर गुन्हा दाखल

पिंपरी : स्त्री जातीचे सात दिवसांचे मृत अर्भक शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळले. हिंजवडी जवळ माण येथे राक्षे वस्तीत हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. १६) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे.मोहन आनंदा राक्षे (वय ३५, रा. राक्षे वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राक्षे यांची माण गावाच्या राक्षे वस्ती येथे मुळा नदी काठी शेती आहे. गुरुवारी (दि. १६) सकाळी आठच्या सुमारास शेतीला पाणी देण्यासाठी फिर्यादी राक्षे शेतावर गेले. नदीकाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी जात असताना त्यांना त्यांच्या शेतात जमीन खोदलेली आढळून आले. तसेच तेथे झाडाच्या फांद्या आणि काटेकुटे टाकल्याचे त्यांना दिसून आले. राक्षे यांनी पाहणी केली असता तेथे पांढऱ्या कापडात काहीतरी पुरले असल्याचे त्यांना आढळून आले. फांद्या आणि काटेकुटे बाजूला करून पांढरे कापड बाहेर काढले असता त्यामध्ये सात ते आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यानंतर राक्षे यांनी याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात अर्भक देण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस