शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार; महिला अंध असल्याचे कारण देत नाकरले गॅस कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:26 IST

सदर महिला ह्या अंध असून भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? गॅस मालकाचा सवाल

लोणावळा: बॅकेमध्ये नोकरी करणार्‍या एका अंध महिलेची मुंबईतून लोणावळ्यात बदली झाली आहे. त्यांनी लोणावळ्यात आल्यानंतर स्वंपाकासाठी गॅस कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला मात्र गॅस एजन्सी धारकाने महिला अंध असल्याचे कारण देत गॅस कनेक्शन देणे नाकारले असल्याचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला आहे.

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात उज्वल गॅस योजना सुरू केली. ज्यामुळे ग्रामीण भागासह गरीब कुटुंबातील महिलांना गॅस वापरता येईल. याचा प्रचार प्रसार सर्वत्र केला जात आहे. मात्र याच मोदींच्या योजनेला लोणावळ्यात मोडीत काढण्यात आले आहे. केवळ महिला अंध आहे म्हणून गॅस कनेक्शन नाकारण्यात आलं आहे. अंध असल्याने गॅस कनेक्शन देऊ शकत नाही असं थेट गॅस एजन्सी मालकाकडून सांगण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील रहिवासी असलेल्या संगीता कोल्हापूरे यांची बदली नुकतीच ठाण्यातून लोणावळा येथे झाली आहे. त्यानंतर त्यांनी लोणावळ्यात एक खोली भाड्याने घेतली. जेवण बनविण्यासाठी त्यांना गॅसची आवश्यकता असल्याने त्यांनी लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सी कडे नवीन गॅस कनेक्शन ची मागणी केली. परंतु परमार गॅस एजन्सी ने त्यांना कनेक्शन नाकारले. याबाबत त्यांनी विचारणा केली असता एजन्सी ने तुम्ही अंध असल्याने कनेक्शन देऊ शकत नाही असे सांगितले. तसे गॅस एजन्सी ने त्यांना लेखी लिहून देखील दिले आहे. मात्र अंध असले तरी पोटासाठी जेवण बनवावे लागत असल्याच्या भावना संगिता कोल्हापूरे यांनी व्यक्त केल्या. तर परमार गॅस एजन्सीचे मालक प्रकाश परमार म्हणाले, कंपनीचे काही नियम आहेत त्यानुसार आम्ही परवानगी नाकारली आहे. आम्ही त्यांची आडवणूक केलेली नाही. सदर महिला ह्या अंध आहेत भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार. मात्र त्यांचे अंडरटेकिंग घेऊन गॅस कनेक्शन देता येऊ शकेल का याबाबत कंपनीकडे विचारणा केली आहे.    समाजात वावरताना अंध किंवा अपंग असले तरी त्यांना जगण्याचा अधिकार आहे. लोणावळ्यात अंध महिलेबरोबर घडलेला प्रकार हा निंदनीय असून याबाबत संबंधित गॅस एजन्सी मालकाला जाब विचारला जाईल असे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर व भाजपाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरSocialसामाजिकMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकारlonavalaलोणावळा