शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत शिवसैनिक-भाजपा कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:20 IST

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने...

पिंपरी : राज्यातील राजकीय भूकंपाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये देखील उमटले. पिंपरी येथे गुरुवारी (दि. २३) सायंकाळी शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. ‘गद्दार आमदारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. देवेंद्र फडणवीस तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटी येथे गेल्याने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डळमळीत झाल्याचे सध्या चित्र आहे. गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवसैनिकांकडून पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमा खापरे यांचे स्वागत करून शहर भाजपाकडून रॅली काढण्यात आली. पिंपरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक येथे ही रॅली आली. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांच्या समोर उभे ठाकले. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यता असल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर भाजपाची रॅली मार्गस्थ झाली. 

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकणी गुन्हा दाखलउद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक पिंपरी चौकात एकत्र आले. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली नाही. यातून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वपरवानगी न घेता जमाव केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड