शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

मुंबईतील " ती " चा जगण्यासाठी सासरच्यांशी दीड महिने संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 07:00 IST

लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तरुणीचा केला छळ

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते, पोलिसांच्या मदतीने सुटका

नारायण बडगुजर - पिंपरी : कोरोनामुळे संपूर्ण जग घरात बंदिस्त आहे. मात्र, काही विकृतांना या महामारीतही पैशांचा हव्यास आहे. कमावत्या सुनेचे काम लॉकडाऊनमुळे बंद झाल्याने तिला घरातील हॉलमध्ये डांबून ठेवत सासरच्यांनी तिचा छळ केला. तिचा फोन हिसकावून घेत तिला अन्नपाणीही दिले नाही. घराबाहेर जग कोरोनाशी लढत असताना ती घरातच दीड महिना जगण्यासाठी घरातील मंडळींशी संघर्ष करीत होती.   मराठवाड्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील बीस्सीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणीची ही व्यथा आहे. मुंबई येथील एक तरुणासोबत तिचे लग्न झाले. सासरे मोठे अधिकारी तर पती इंजिनिअर असल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, पती कॉम्प्युटर ऑपरेटर तर सासरे सुरक्षारक्षक असल्याचे लग्नानंतर समोर आले. त्यानंतर तिला नोकरी करण्याचे सांगण्यात आले. तिने नोकरी केली. पगाराची रक्कम सासरचे मंडळी ठेवून घेत. मात्र, तरीही तरुणीची कुरबूर नव्हती. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन झाले आणि तिचे काम बंद झाले. परिणामी पगार बंद झाला. तू नोकरी करून आम्हाला पैसे द्यावेस म्हणून तुला येथे आणले आहे. मात्र, आता तुझे काम बंद आहे. त्यामुळे तुझ्याकडून आम्हाला पैसे मिळत नाही. तू येथेच रहायचे, असे सांगून सासरच्यांनी तिला घराच्या हॉलमध्ये डांबून ठेवले. तिच्याकडील स्मार्टफोन हिसकावून घेतला. तसेच पुरेसे जेवण व पाणी द्यायचेही बंद केले. माहेरून आणलेला बेसिक मोबाइल फोन तिच्याकडे होता. त्यावरून तिने नातेवाइकांना संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या तिच्या बहिणीशी तिचा संपर्क झाला. बहिणीला सर्व हकिगत सांगितली.   बहिणीने देखील अनेकांशी संपर्क साधला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा वर्षा जगताप यांना त्यांनी बहीण अडकली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबईतील संबंधित भागातील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी तरुणीशी संपर्क साधला, तिची व्यथा जाणून घेतली. त्यानंतर एका तासात पोलिसांचे पथक तरुणीच्या घरी पोहोचले. दाराची बेल वाजली आणि तरुणीला हायसे वाटले. दार उघडताच तरुणी पोलिसांसमोर घरातून धावतच बाहेर आली. मला रस्त्यावर सोडा, पण येथून घेऊन चला, अशी विनवणी करून ती तरुणी धाय मोकलून रडत होती. 

तरुणीला सोबत घेऊन पोलीस तिच्या घरून निघाले. पोलिसांनी तिच्या राहण्याची व्यवस्था केली. लॉकडाऊन असल्याने प्रवासाचे साधन नव्हते. त्यामुळे वाहनाची व्यवस्था तसेच पास मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यात दोन दिवस गेले. त्यानंतर तरुणीला मराठवाड्यातील तिच्या माहेरी पाठविण्यात आले. दरम्यान, तिचे वाहन पिंपरी-चिंचवड शहरातून जात असल्याने वर्षा जगताप यांनी तरुणीची भेट घेतली. तिला जेवणाचा डबा व कपडेदेखील दिले. त्यावेळी तरुणीला अश्रू अनावर झाले. आपण बहिणीला सांगितले. तिच्या सांगण्यावरून तुम्ही मदत केली. त्यामुळे मी जिवंत आहे. तुमच्यामुळे मला नवीन जन्म मिळाला, असे तरुणी म्हणाली. --------------------पोलिसांनी दाखविली तत्परता...तरुणीच्या बहिणीने मला सांगितल्यानंतर मी खासदार सुप्रिया सुळे यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. तसेच सक्षणा सलगर व आदिती नलावडे यांना संपर्क साधला. त्यांनी मुंबई परिसरातील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तत्परता दाखवत तरुणीची सुटका केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यामुळे त्या तरुणीला तिच्या वडिलांकडे पाठविण्यात आले. माहेरी पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे याबाबत तरुणी तक्रार करणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक संकटे उभी ठाकली आहेत. अशावेळी घरातल्या मंडळींनी सुनेला अशी वागणूक देणे माणुसकीला काळिमा फासणारे आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई