शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

शशांकचा कारनामा; स्वतःचाच खिसा भरला, जेसीबी व्यवहारात ११ लाखांची फसवणूक, चाकणमध्ये तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:52 IST

फसवणूक झालेल्या प्रशांत यांनी विश्वास ठेवून शशांक हगवणेकडे हप्ते दिले होते, मात्र ते त्याने बँकेत न भरता स्वतःच्या खिशात घातले

चाकण: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आता आर्थिक फसवणुकीचे आरोपही होत आहेत. शशांक हगवणे याच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. प्रशांत येळवंडे (रा.निघोजे,ता.खेड ) यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली असून,या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत येळवंडे आणि शशांक हगवणे यांच्यात २५ लाख रुपये किमतीच्या जेसीबी खरेदीसंदर्भात व्यवहार ठरला होता. त्यानुसार, प्रशांत यांनी सुरुवातीला शशांक हगवणेला ५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. पुढील अटीप्रमाणे जेसीबीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचे हप्ते प्रशांत हे दरमहा ५० हजार रुपये शशांक हगवणेला देत होते. हा व्यवहार एक विश्वासावर आधारित असतानाही, शशांकने हप्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला. दरम्यान, शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडवून आणल्याचा दावा केला. मात्र प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते, त्यापैकी एकाही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही. या व्यवहारातून प्रशांत यांना एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू 

आर्थिक फसवणुकीबाबत चाकणजवळील महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हगवणे कुटुंबीयांवर वाढत चाललेला दबाव

या प्रकरणामुळे आधीच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शशांक हगवणेवर याआधी गर्भवती पत्नीस छळ, हुंडा मागणी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाला असून तो कोठडीत आहे. यातच आता आर्थिक फसवणुकीचे नवे प्रकरण उघड झाल्यामुळे पोलिसांच्या तपासाची व्याप्ती अधिक वाढणार असल्याचे संकेत आहेत.

पिस्तुल दाखवून धमकी प्रकरणही चर्चेत

हगवणे कुटुंबातील सदस्याने पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोप होत आहे. मात्र,त्यावेळी दबावामुळे पिस्तूलाचा उल्लेख केला नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. आता पोलीस पिस्तूल दाखवल्याचा आरोप दाखल करून घेणार का,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी कागदपत्र पडताळणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - शिवाजी पवार,पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणMIDCएमआयडीसीPoliceपोलिसVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेfraudधोकेबाजीMONEYपैसा