शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आपण दोघे नवरा बायकोच आहोत सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार अन् केला गर्भपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:25 IST

लग्नाच्या अगोदर मूल होणे बरे नाही, असे बोलून आरोपीने फिर्यादीला दवाखान्यात नेले.

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तसेच आपण दोघे नवरा बायकोच आहोत, असे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. यातून महिला गरोदर राहिल्याने गर्भपात केला. लग्नास नकार देत महिलेची फसवणूक केली. देहूगाव येथे २० जुलैला रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 

पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. २७) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमनाथ मारुती गोदे (वय ३६, रा. जाधववाडी, चिखली), राजेंद्र फटाते (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ गोदे याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. आपण दोघे नवरा बायको आहोत, असे सांगून फिर्यादीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे फिर्यादी गर्भवती राहिली. लग्नाच्या अगोदर मूल होणे बरे नाही, असे बोलून आरोपीने फिर्यादीला दवाखान्यात नेले. कागदोपत्री आपण नवरा बायको आहोत, असे लिहून देत आरोपीने डाॅक्टरांनाही खोटे सांगून फिर्यादीचा गर्भपात केला. आमच्या घरचे तुला स्वीकारणार नाहीत, असे म्हणून आरोपीने लग्नास नकार देत फिर्यादीची फसवणूक केली. 

आरोपी गोदे याचा नातेवाईक असलेला आरोपी फटाते याने फिर्यादीला धमकावले. तू जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुला जीवे ठार मारू, अशी धमकी आरोपी फटाते याने फिर्यादीला दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस