शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी आयटीपार्क येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी 'ते 'हॉटेल केले सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 11:37 IST

हिंजवडी येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे आरोपी काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते.

पिंपरी : आयटीपार्क, हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात ही कारवाई केली होती. या हॉटेलला सहा महिन्यांसाठी पोलिसांनी ‘सील’ केले आहे.  गणेश कैलास पवार (वय २०, रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी, मूळ रा. सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

हिंजवडी येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे आरोपी काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून तरुणींची सुटका केली. त्यानंतर हे हॉटेल सीलबंद करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. आयुक्तांनी कायदेशीर बाबींचे अवलोकन करून हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांकडे पाठवला. त्यांच्या आदेशानुसार हॉटेल सहा महिन्यांसाठी सीलबंद करण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक अनंत दळवी, पोलीस कर्मचारी किरण पवार, विजय घाडगे, अविनाश कुमटकर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसhotelहॉटेलWomenमहिला