सात महिन्यांत सहाजण जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:00 IST2017-08-01T04:00:36+5:302017-08-01T04:00:36+5:30

महापालिका भवनातील टक्केवारीची प्रकरणे गाजत आहेत. महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांची खाबुगिरी वाढली आहे. गेल्या सात महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सहा जण

In seven months, six people have been trapped | सात महिन्यांत सहाजण जाळ्यात

सात महिन्यांत सहाजण जाळ्यात

पिंपरी : महापालिका भवनातील टक्केवारीची प्रकरणे गाजत आहेत. महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांची खाबुगिरी वाढली आहे. गेल्या सात महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सहा जण अडकले आहेत. तर गेल्या काही वर्षांत एकूण २१ जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे.
सोमवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लेखाधिकाºयांस हजारांची लाच घेताना पकडले. त्यामुळे पालिकेतील प्रशासकीय खाबुगिरी ऐरणीवर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार १९९७ पासून एकूण २१ जणांवर कारवाई झाली आहे. त्यांपैकी १२ जणांची न्यायालयात निर्दोष मुक्तता झाल्याने त्यांना सेवेत रुजू करून घेतले आहे, तर दोन जणांना निलंबित केले आहे. एकास रुजू करून घेण्यासंदर्भात दावा सुरू असून, गुन्हे दाखल असलेल्या पाच जणांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
२००५ मध्ये भूमी जिंदगी विभागातील नारायण ढोरे या लिपिकाने पाच हजारांची लाच घेतली होती. न्यायालयाने त्यांचे निलंबन रद्द करून सेवेत परत घेतले आहे.
१९९८ मधील वायसीएममधील लिपिक रमेश भोसले यांना लाचप्रकरणी अटक केली होती. मात्र, न्यायालयाने दोषमुक्त केल्याने त्यांना परत सेवेत घेतले.
२०१२ मध्ये आरोग्य दिलीप वाधवानी यास लाचेची मागणी केल्याने अटक केली होती. न्यायालयाने दोषमुक्त केल्याने पुन्हा सेवेत घेतले होते. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे.

Web Title: In seven months, six people have been trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.