शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाणार; गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:49 IST

तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत असून हे केवळ स्पा नसून अंमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा आणि वेलनेस सेंटर्स’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा बुधवारी (दि. १८) विधान परिषदेत आला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे लक्ष वेधले. स्पा व्यवसायासाठी तीन महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

आमदार गोरखे म्हणाले, शहरात शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अंमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत. पोलिस कारवाई करतात, पण दोन दिवसांत तेच मालक नव्या नावाने सेंटर सुरू करतात.गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती तयार केली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल लवकरच सादर होईल. पुढील तीन महिन्यांत नवीन नियमावली लागू केली जाईल.

नायडू, पटेल, शेख, फकीर टोळी

पिंपरी-चिंचवडमधील नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा अनेक ठराविक लोकांची संघटित साखळी हा काळा बाजार चालवत आहेत. केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हे न नोंदवता, या मास्टरमाइंड्सच्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर 'मकोका'अंतर्गत कठोर कारवाई करावी, स्वतंत्र नियमावलीची मागणीदेखील आमदार गोरखे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Strict Spa Regulations Coming in Three Months, Minister Assures

Web Summary : Maharashtra to implement strict spa regulations in three months due to illegal activities. Minister Yogesh Kadam assured action against human trafficking and drug abuse, targeting key individuals and organized crime networks operating under the guise of wellness centers.
टॅग्स :PuneपुणेHome Ministryगृह मंत्रालयvidhan sabhaविधानसभाPoliceपोलिसYogesh Kadamयोगेश कदमWomenमहिला