शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पिंपरी शहरातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी हवे '' सुरक्षाकवच ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 18:58 IST

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढले

ठळक मुद्देसरत्या वर्षाचा आढावा : अमली पदार्थांची तस्करी वाढली भरदिवसा होणाऱ्या खुनाच्या घटनांनी २०१८ मध्ये शहर होते हादरले प्राणांतिक अपघात गेल्या वर्षी ३१० तर, यंदा २८७ अल्पवयीन मुलींच्या पालकांना चिंतापळवून नेल्याचे गेल्या वर्षी ४१२ तर, यंदा ४८९ गुन्हे दाखल गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार

नारायण बडगुजर- पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कमी झाले. मात्र, असे असले तरी महिला अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे तीची सुरक्षा धोक्यात आहे. शहरात वर्षभरात जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक, पळवून नेणे या गुन्ह्यांसह आत्महत्यांचे प्रकार यंदा जास्त घडले. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हेही यंदा जास्त आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सरत्या वर्षात सामान्यांच्या सुरक्षेसह पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दाही चिंता वाढविणारा ठरला. .........

वाढती गुन्हेगारी डोकेदुखी ठरत असल्याने पिंपरी-चिंचवड शहर व येथील औद्योगिक परिसरासाठी १५ आॅगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आयुक्तालयांतर्गत निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, वाकड, दिघी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी व चिखली हे १५ पोलीस ठाणे आहेत. या ठाण्यांच्याअंतर्गत गुन्हे कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. यात काही अंशी यश आले असले तरी, काही गुन्ह्यांचा आलेख चढताच आहे.

............

भरदिवसा होणाऱ्या खुनाच्या घटनांनी २०१८ मध्ये शहर हादरले होते. खूनप्रकरणी गेल्या वर्षी ६४ तर, यंदा ६२ गुन्हे दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्यावर्षी ८२ तर, यंदा ८० गुन्हे दाखल आहेत. सदोष मनुष्यवधाचे गेल्या वर्षी सहा, तर यंदा तीन गुन्हे दाखल आहेत. प्राणांतिक अपघात गेल्या वर्षी ३१० तर, यंदा २८७ झाले. ...............अमली पदार्थांची तस्करी वाढली अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यश आल्याचे दिसून येते. अमली पदार्थ तस्करी, विक्री, बाळगल्याप्रकरणी गेल्या वर्षी १४ तर, यंदा ३७ गुन्हे दाखल आहेत. तसेच बेकायदा पिस्तूल, गावठी कट्टा आदी शस्त्र बाळगण्याचे प्रकार यंदा कमी झाले आहेत. त्यानुसार आर्म अ‍ॅक्ट अन्वये गेल्या वर्षी ६९ तर, यंदा ४४ गुन्हे दाखल आहेत. जुगार खेळणाऱ्यांवरील कारवाईत वाढ झाली असून, या प्रकरणी गेल्या वर्षी २३१ तर, यंदा २३६ गुन्हे दाखल आहेत...........अल्पवयीन मुलींच्या पालकांना चिंतापळवून नेल्याचे गेल्या वर्षी ४१२ तर, यंदा ४८९ गुन्हे दाखल झालेत. यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार अधिक आहेत. शाळा, खासगी शिकवणी तसेच इतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुलींना पळवून नेण्यात येते. त्यामुळे अल्पवयीन मुलींच्या पालकांची चिंता वाढल्याचे दिसून येते. बलात्कारप्रकरणी गेल्या वर्षी १३३ तर, यंदा १५१ गुन्हे दाखल आहेत. विनयभंगप्रकरणी गेल्या वर्षी २९७ तर, यंदा ३९७ गुन्हे दाखल आहेत. यावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

 .......पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हेकोणते गुन्हे                         २०१९                   २०१८खून                                     ६२                          ६४खुनाचा प्रयत्न                     ८०                         ८२सदोष मनुष्यवध                  ३                           ६आत्महत्या                          ४८                        ४०बलात्कार                           १५१                      १३३विनयभंग                        ३९७                        २९७दरोडा                               २९                          ३९जबरी चोरी                      ३३३                       २६०घरफोडी                          ५१                           ४९वाहनचोरी                     ११९०                      १३२४फसवणूक                    ३८८                           २९६पळवून नेणे                 ४८९                         ४१२सरकारी हल्ले                 ४७                         ५२प्राणांतिक अपघात      २८७                           ३१०इतर गुन्हे                    ७८५                          ६६१आर्म अ‍ॅक्ट                  ४४                           ६९जुगार                       २३६                           २३१अमली पदार्थ              ३७                              १४प्रोव्हेबिशन              ११००                          ५८९कॉपिराईट कायदा        ७                              १सावकारी अधिनियम    २                               १

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस