शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"एटीएमची जबाबदारी असलेल्या एजन्सीकडून सुरक्षेबाबत हलगर्जीपणा, गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 16:55 IST

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सज्जड इशारा,पिंपरीत एटीएम चोरी प्रकरणात होतीये वाढ

ठळक मुद्देबँकांनी नवीन एटीएम सुरू करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी. सुरक्षेचे मापदंड पाळून एटीएम सुरू करावे

पिंपरी: शहरात सातत्याने एटीएम फोडून चोरीच्या घटना समोर येत आहेत. एटीएमची जबाबदारी असलेल्या एजन्सीकडून सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केला जात आहे. असे दुर्लक्ष केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.  

एटीएमची देखभाल आणि सुरक्षेसाठी बँकांकडून एजन्सीची नेमणूक केली जाते. त्यांच्या बेजबाबदारीने एटीएम फोडण्याच्या घटना घडत आहेत. हरियाणा येथील एका टोळीने भोसरीतील पांजरपोळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडले. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. पांजरपोळ येथील एटीएमची जबाबदारी असलेल्या संस्थेचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल, असेही आयुक्तांनी खडसावून सांगितले. 

बँकांनी नवीन एटीएम सुरू करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी. सुरक्षेचे मापदंड पाळून एटीएम सुरू करावे. एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्यासाठी सायरन आणि अन्य तांत्रिक बाबींचा समावेश करावा. ते चालू स्थितीत असल्याचे वारंवार तपासायला हवे. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालताना देखील नेहमीच लक्ष ठेवतात. चिखली येथे पोलिसांनी रात्री लक्ष ठेवल्यामुळे एक एटीएम फोडीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकांनी पोलिसांना एटीएमची माहिती तर द्यावीच. परंतु नवीन सुरू करताना पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे. त्याबाबत बँकांना पोलिसांकडून पत्र देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.   

बँकांची जबाबदारी काय?

बँकांकडून एजन्सीकडे एटीएमची सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यासोबतच एटीएमला विमा संरक्षण घेण्यात येते. परिणामी एटीएमची तोडफोड किंवा चोरी झाल्यास संबंधित बँकेला विम्याची रक्कम मिळते. त्यामुळे त्यांच्याकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. एटीएमच्या सुरक्षेबाबत बँकांची जबाबदारी काय आहे, याबाबत माहिती घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसatmएटीएमCrime Newsगुन्हेगारी