शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक : नम्रता पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:06 IST

मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षण करत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे....

ठळक मुद्देताथवडे : वाकड पोलीस आयोजित सुरक्षारक्षकांसाठी मार्गदर्शन शिबीर सुरक्षा रक्षकांना स्वाभिमानाची चांगली वागणूक द्यावी

वाकड : सुरक्षारक्षकाने चाणाक्ष नजर, चपळपणा आणि स्मार्ट वर्क करीत थोडे सजग राहिल्यास अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल तसेच मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षा करीत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रत्येकजण कुठे ना कुठे सुरक्षा रक्षकांमुळे सुरक्षित असल्याने सुरक्षा रक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ताथवडे येथे केले.  वाकडपोलिस ठाण्याच्या वतीने निवासी सोसायटी-कंपनी मधील खाजगी सुरक्षा रक्षक यांच्यासाठी मालमत्ता सुरक्षा, आग, लिफ्ट अपघात प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाय योजनांबाबत सोमवारी (दि. १) येथील बालाजी सोसायटीत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या शिबिराला सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे,  बिजू पिल्ले, प्रमुख वक्ते व गुन्हे प्रतिबंध तज्ञ् शरद श्रीवास्तव, ओटीजचे रॉनी चौधरी, संतोष शर्मा, सुदेश राजे, अरुण देशमुख, किरण वडगामा, शिवाजी कटके, बाळासाहेब कलाटे, यांच्यासह वाकड व हिंजवडी परिसरातील सोसायटीचे चेरमन -सेक्रेटरी आणि विविध एजन्सीत काम करणारे सुमारे चारशे सुरक्षा रक्षक उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सुरक्षा रक्षकांना आपली खाजगी आणि व्यक्तिगत कामे सांगू नये. त्याला स्वाभिमानाची चांगली वागणूक द्यावी. या शिबिरात पुढील तज्ञांनी मार्गदशन केले. शरद श्रीवास्तव यांनी आधुनिक सुरक्षा व्यवस्था तसेच गुन्हे घडू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी व सुरक्षा रक्षक व एजन्सी यांच्याबाबत नियम कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन केले, ऋषिकांत चिपाडे यांनी आग लागल्यांनंतर सुरक्षारक्षक म्हणून करावयाची कृती व जबाबदारी तसेच त्यांचे याबाबत अज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले रॉनी चौधरी यांनी लिफ्टमध्ये होणारे अपघात व त्याबाबत घ्यावायची काळजी, यांच्यासह झवर यांनी सीसी टीव्हीचे कंट्रोलिंग आणि डाटा सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. 

टॅग्स :wakadवाकडtathawdeताथवडेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी