शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधकार्यात जलपर्णीचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 21:26 IST

पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात उडी मारल्याने बुडालेला तरुण ३६ तास शोध घेऊनही सापडला नाही. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास तरुण बुडाला होता. त्या दिवशी अग्निशामक दलाच्या दोन पथकांनी शोध घेतला.

सांगवी : पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात उडी मारल्याने बुडालेला तरुण ३६ तास शोध घेऊनही सापडला नाही. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास तरुण बुडाला होता. त्या दिवशी अग्निशामक दलाच्या दोन पथकांनी शोध घेतला. बुधवारी (दि. १०) सकाळपासून व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा अर्थात आधुनिक पध्दतीच्या कॅमेºयाचा वापर करण्यात आला. नदीपात्रात पाण्याच्या तळाशी हा कॅ मेरा टाकून शोध घेण्यात आला. मात शोध लागला नाही. त्यासाठी गुरुवारी पुन्हा ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. मात्र तरीही तरुणाचा शोध लागला नाही. जोरदार पाऊस झाल्याने नदीतील पाणी पातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगात होता. तसेच नदीपात्रातील जलपर्णीमुळे देखील शोधकार्यात बाधा आली. 

शुभम येडे (वय २३, रा. राहटणी) असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम याचा मंगळवार सायंकाळपासून शोध घेण्यात येत आहे. मात्र ३६ तास उलटूनही शोध लागला नाही. गुरुवारी सायंकाळी पुरेसा उजेड नसल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व अग्निशामक दलाने शोधकार्यात व्हिक्टीम लोकेशन व ड्रोन कॅमेरा वापरला. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच अधिकारी घटनास्थळी दिवसभर तळ ठोकून होते. पिंपळे गुरव येथे नदीतील घाट परिसरात मंगळवारी व बुधवारी शोधकार्य सुरू होते. मात्र दापोडी येथील हॅरीस पूल व बोपोडीला जोडणाºया पुलाच्या मध्यवर्ती भागात नदीपात्रात कोणीतरी वाहून जाताना काही लोकांनी सांगितले. त्यानुसार गुरुवारी दुपारी दोनपासून पिंपळे गुरव येथील शोधकार्यात गुंतलेली यंत्रणा दापोडी येथे हलवण्यात आली. सायंकाळी सातपर्यंत दापोडी येथे नदीपात्रात शोधकार्य सुरू होते. परंतु शुभम याचा शोध लागला नाही. दरम्यान आधुनिक तंत्रांचा वापर करीत दापोडी येथे ड्रोन कॅमेºयाच्या साह्याने शोध घेण्यात आला. मात्र नदीत फोफावलेल्या जलपर्णीमुळे त्यात अपयश आले. नागरिकांनी येथे गर्दी केली होती. शुभम याच्या नातेवाईकांचीही तीन दिवसांपासून घालमेल होत आहे.  

महापालिकेच्या अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बाहीवाल, आपत्ती व्यवस्थापनचे उप अधिकारी अरविंद गुळी, शांताराम काटे, उपअभियंता जयदीप पवार, आशुतोष हरनवळ, रमेश गायकवाड आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी शोधकार्यात सहभाग घेतला होता.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसSuicideआत्महत्या