भारतीय जैन संघटना विद्यालयात विज्ञान मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:55 IST2017-08-01T03:55:57+5:302017-08-01T03:55:57+5:30
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयांत अभिरुची निर्माण व्हावी यासाठी संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात

भारतीय जैन संघटना विद्यालयात विज्ञान मंडळ
नेहरुनगर : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयांत अभिरुची निर्माण व्हावी यासाठी संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान मंडळाची स्थापना केली.
या विज्ञान मंडळाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांचे हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. या वेळी सर्प विज्ञान संस्था पुणे संचालक दीपक सावंत, शिक्षणाधिकारी भाग्यश्री मोरे, प्राचार्या विजया चव्हाण, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख अनुजा गाडगे, प्रा़ अविनाश यादवाडकर, मधुकर जगताप आदी शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च माध्यमिक विभागप्रमुख अनुजा गाडगे यांनी शालेय उपक्रमांचा आढावा घेऊन विज्ञानमंडळाचे कार्य स्पष्ट केले. प्राचार्या विजया चव्हाण यांनी मनोगतातून पर्यावरणपूरक गट निर्माण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश यादवाडकर व आभार मधुकर जगताप यांनी मानले.