शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Video: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती...., वैष्णवांसंगती तुकोबा निघाले पंढरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:59 IST

संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले

देहूगाव : कोरोना महामारीचे संकट ओसरताच अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. ‘‘इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी,  तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती.’’ अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत आली. ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...अशी विठूरायाच्या भेटीची आर्तता वैष्णवांठायी दिसून आली. यंदा पावसाने ओढ दिली असली तरी आषाढी वारीस येणाऱ्या वैष्णवांचा उत्साह तसूरभरही कमी न झाल्याचे दिसून आले.  कोरोना महामारीचे संकट असल्याने गेली दोन वर्षे आषाढी वारीचा सोहळा हा साधेपणाने, निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा केला जात होता. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सरकारने निर्बंध शिथिल केले आणि आषाढी वारी होणार असल्याने वारकरी वर्गात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.आषाढीवारीसाठी रविवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाहून निघाली होती. पालखी प्रस्थान सोहळा आज असल्याने भल्या सकाळीच वारकºयांनी इंद्रायणी स्रान केले. सकाळपासूनच आज वातावरण ढगाळ होते. तर अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बसरत होत्या.

कडेकोट बंदोबस्त, मंदिर सजविले मोहक पुष्पांनी

सकाळपासूनच मुख्यमंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर संपूर्ण मंदिर परिसर सुगंधी फुलांनी सजविला होता. मंदिरपरिसरात कडेकाट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी आठला पाथरुडकर दिंडी व गंगा म्हसलेकर अशा म्हसलेकर मंडळींनी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन घोडेकर सराफ यांच्या घरी पादुकांना चकाकी देण्यासाठी नेल्या. तिथेच पाद्यपुजा अभंगारती झाली. त्यानंतर पादुका इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. इनामदार वाड्यात दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींनी टाळ मृदंगाचा निनाद करीत मुख्यमंदिरातील वीणामंडपात आणल्या. आज  दर्शनबारीचे नियोजनही नेटके झाले होते. सकाळी दहाला काल्याचे किर्तन रामदास महाराज मोरे यांनी केले. ‘‘अनंत ब्रम्हांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी...’ हा अभंग महाराजांनी कीर्तनास निवडला होता. सूर्यनारायण डोईवर येऊ लागला तसा मुख्य मंदिरात वैष्णवांची गर्दी होऊ लागली.

नभांगणी उन सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडला

उन सावल्यांचा खेळ सुरू झाला. प्रस्थानाची वेळ झाल्याने तसाच मुख्यमंदिरात दिंड्या जागा घेऊ लागल्या.  आसमंती भगव्या पताका फडकावीत वैष्णवांची पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच चैतन्य होते. अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली. तर मंदिर आवारात मानाचे अश्व दाखल झाले तर देहूकर दिंडीने ‘ज्ञानोबा तुकाराम’ या तालावर टाळ मृदंग-कल्लोळ आणि वीणेचा झंकार करायला सुरूवात केली. दुसरीकडे वीणामंडपात महापूजा झाली. देहू संस्थानाच्या वतीने मानकºयांचा आणि दिंडेकºयांचा सन्मान केला. नभांगणी उन सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडल्याचे दिसून आले.

अन् वरूणांचाही अभिषेक

तर टाळमृदंगाचा कल्लोळ टीपेला पोहोचला होता. साडेतीनच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... असा जयघोष करीत देहूतील तरूणांनी पालखी खांद्यावर घेतली. वीणा मंडपातून अपूर्व उत्साहात पालखी बाहेर पडली. त्यावेळी वरूणराजाने सोहळ्यावर हलकासा अभिषेक केला. त्यानंतर मंदिरप्रदिक्षिणा करून पालखी मुख्यमंदिरातून बाहेर आली. सोहळा पंढरीकडे मार्गस्त झाला. त्यानंतर पालखी आजोळघरी इनामदारवाड्यात विसावली. मंगळवारी सकाळी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होणार आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant tukaramसंत तुकारामSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी