शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

महिला पोलिसांच्या कार्याला सलाम! लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत बजावतात कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:45 IST

कोरोना संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा

ठळक मुद्देपिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता असल्याने महिला पोलिसांनाही बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे.

नारायण बडगुजर 

पिंपरी: कोरोना काळात लाॅकडाऊन व निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महिलापोलिसांनाही रस्त्यावर उतरावे लागले आहे. चेकपोस्ट, नाकाबंदी तसेच गस्तीसाठी कर्तव्य बजवावे लागत आहे. लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत या ‘वुमेन वॉरियर्स’ला ड्युटी करावी लागत आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, लेकरांना जवळ घेता येत नाही, त्यामुळे हे संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा या महिलापोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेण्यात येत आहे. त्यात तुलनेने कमी संख्या असूनही महिला पोलिसांना बारा तासांपेक्षा जास्त काम  करावे लागत आहे. परिणामी त्यांची मुले, कुटुंबातील इतर सदस्य तसेच नातेवाईकांनाही वेळ देणे सहज शक्य होत नाही. तसेच छोट्या कुटुंबातील त्यांची मोठी कसरत होत आहे. मुलांना सांभाळायला कोणी नसल्याने त्यांची घालमेल सुरू असते. त्यामुळे काहींनी मुलांना गावाकडे तसेच आजोळी पाठवले आहे. मात्र तरी देखील मुलांची काळजी लागून असते. तसेच घरच्यांकडून या महिला पोलिसांची सातत्याने चौकशी केली जाते. 

कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच

शहर पोलीस दलातील महिला पोलिसांची मुले बाल्यावस्थेत तसेच विद्यार्थीदशेत आहेत. शहरातील काही महिला पोलिसांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयामध्ये ड्युटी करावी लागते. त्यामुळे त्यांना स्वत:ला विलगीकरणात रहावे लागते. अशावेळी मुलांना भेटता येत नाही. त्यांना जवळ घेता येत नाही. तसेच नातेवाईकांकडे जाता येत नाही. अशावेळी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी मोबाईलवरूनच विचारपूस केली जाते. प्रत्यक्षात भेट होत नसल्याने व्हिडीओ कॉल करून भेट झाल्याचे समाधान त्यांना मानावे लागते.

पोलीस शिपाई उज्वला पाटील म्हणाल्या,  अनुकंपा तत्वावर मी पोलीस दलात दाखल झाले. मुली घरी एकट्याच असतात. फोनवरूनच त्यांना समजूत घालावी लागते. महिलांशी संबंधित प्रकरणे असल्यास त्यासाठी पूर्ण वेळ द्यावाच लागतो. अशावेळी मुलींचा फोन घेता येत नाही. नाकांबंदी, बंदोबस्त असल्यास रात्री उशिरापर्यंत ड्यूटी करावी लागते.

"ड्यूटी करून रात्री उशिरा घरी गेल्यानंतर अंघोळ करावी लागते. त्यानंतर जेवण करून मुलांना किमान अर्धातास द्यावा लागतो. रात्री दहानंतर मुलींचा फोन किंवा व्हिडीओ काॅल येतो. मम्मी केव्हा येणार तू, अशी विचारणा करतात. नातेवाईकही मोबाइलवरून काळजी घ्या, असे आस्थेवाईकपणे सांगतात. असे सांगवीच्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी सांगितले आहे".  

महिलांशी संबंधित प्रकरणे संवेदनशील असतात. त्याचे कामकाज ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते. त्यात मोठा वेळ जातो. यात रात्री उशिर होतो. अशावेळी सासू व मुलीचा फोन येतो. नातेवाइकांचीही मोबाइलवरून चौकशी करावी लागते. ते सर्व जण समजून घेतात. महिला पोलिसांनाही ‘ड्यूटी’ महत्त्वाचीच आहे. 

                                                                                     नीता उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, चिंचवड

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसWomenमहिला