शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वुमेन वाॅरियर्सला सॅल्यूट! बाळाला जन्म देईपर्यंत महिला पोलीस ‘ऑन ड्यूटी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:30 IST

गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या महिला पोलिसाचे सर्वत्र कौतुक

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असताना त्यांचा विविध कारवायांमध्ये सक्रिय सहभाग

नारायण बडगुजर

पिंपरी: लहान मुले, जेष्ठ नागरिक तसेच गरोदर महिलांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही महिलापोलिसाने बाळंत होईपर्यंत कर्तव्य बजावले. एका गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या महिला पोलिसाचे कौतुक होत आहे.  

वैष्णवी विजय गावडे, असे त्या कर्तव्य तत्पर महिला पोलिसाचे नाव आहे. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या वैष्णवी या कबड्डीपटू असून राज्य तसेच राष्ट्रीयस्तरीय स्पर्धांमध्ये त्या खेळल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकात त्या प्रतिनियुक्तीवर आहेत. वैष्णवी २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कार्यान्वित केलेल्या सामाजिक सुरक्षा पथकात प्रतिनियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी आहेत.

वैष्णवी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला. त्यांचे पती हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पती व मुलगीसह त्या रहाटणी येथे रहायला आहेत. सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असताना त्यांना विविध कारवायांमध्ये सहभागी असल्याने रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी (दि. २) ऑन ड्यूटी असताना चिंचवड येथे एका चारचाकी वाहनातून दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड येथे सापळा रचून वाहन पकडून मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत गावडे या देखील सक्रिय सहभागी होत्या.

कारवाईत पकडलेला मुद्देमाल व आरोपींना चिंचवड पोलीस ठाण्यात नेण्यात आले व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवी यांना त्रास जाणवला. त्यामुळे तातडीने त्या चिंचवड पोलीस ठाण्यातून थेट चापेकर चौकातील एका खासगी रुग्णालयात गेल्या. तेथे त्यांना दाखल करून घेण्यात आले. दरम्यान त्यांनी पतीला याबाबत फोन करून माहिती दिली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी मुलाला जन्म दिला.

"सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, प्रदीपसिंग सिसोदे, प्रणिल चौगले यांनी सातत्याने मनोबल उंचावले. त्यामुळे कामाचा ताणतणाव आला नाही. महामारीत प्रत्येकाने  ड्यूटी करून आपले योगदान दिले पाहिजे. खिलाडूवृत्ती असल्यास उत्साह टिकून राहतो. असे गावडे यांनी सांगितले". 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र