शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

व्हीलचेअर २०-२० क्रिकेट संघात दापोडीच्या साहिल सय्यदची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 17:32 IST

नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील या २२ वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट खेळामध्ये चमक दाखविली आहे.

पिंपळे गुरव : भारत व बांग्लादेशमध्ये येत्या २८ ते ३१ मार्च दरम्यान इंटरनॅशनल व्हीलचेअर क्रिकेट सिरीज ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांची मालिका होत आहे. ही मालिका मुंबई आणि गोवा येथे होत असून, या मालिकेसाठी दापोडीतील साहिल सय्यद या ९० टक्के अपंगत्व असलेल्या तरुणाची इंडियन व्हीलचेअर क्रिकेट संघात निवड झाली आहे.     नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील या २२ वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट खेळामध्ये चमक दाखविली आहे. या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, मॅन ऑफ द मॅच असा बहुमान मिळवला आहे. सध्या तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळत आहे. केवळ जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर साहिल मार्गक्रमण करीत आहे. साहिलच्या या निवडीचे स्वागत होत आहे. मुंबई आणि गोव्यात पार पडत असलेल्या या मालिकेसाठी साहिल मुंबईला रवाना झाला असून, दोन दिवस त्यांचे तेथे सराव सामने आहेत.              साहिल सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसला, तरी या मुलांप्रमाणे त्याच्या आवडीनिवडी, महत्त्वाकांक्षा आहेत. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड आहे. विशेषत: क्रिकेटची आवड परंतु, तो क्रिकेट कसा खेळू शकेल ? असा त्यांना प्रश्न पडत असे. साहिल मित्रांना जमवून चांगले क्रिकेट खेळू लागला. वडिलांनी त्याला हवे ते खेळाचे साहित्य घेऊन दिले. दहा वषार्चा असताना क्रिकेट चांगला खेळू लागला. साहिलचे वडील सलीम दादाभाई सय्यद हे भारतीय सैन्यदलात होते. साहिलची आई शबनम यांचेही साहिलच्या यशात मोलाचे योगदान आहे. साहिलने जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये त्याने आपली चमक दाखविली. त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. मेरठ येथे पार पडलेल्या इंडियन व्हिलचेअर क्रिकेट लीग स्पर्धेत महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात साहिलला मॅन आॅफ द मॅचचा बहुमान मिळाला होता. बांग्लादेश क्रिकेट दौºयासाठीही साहिलची संघात निवड झाली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याला या दौºयाला जाता आले नाही. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साहिलची घोडदौड सुरु आहे. साहिलला क्रिकेटबरोबरच अ‍ॅथलेटिक (गोळा फेक), पॉवरलिफ्टिंग खेळाची आवड असून, यामध्येही त्याने नैपुण्य मिळविले आहे. अ‍ॅथलेटिकमध्ये त्याने सुवर्णपदक, पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी